गडचिरोली : राज्यभर गाजत असलेल्या वाघांच्या शिकारप्रकरणी बावरिया टोळीसोबतच्या संबंधामुळे ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण’ विभागात सेवा दिलेला निवृत्त अधिकारी मसराम जाखड याच्याबाबत अनेक धक्कादायक बाबी पुढे येते आहे.

जाखड याने निवृत्तीनंतर ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण’ विभागातील माहितीचा वापर केला. मागील दोन दशकांत देशातील विविध भागांत वाघांच्या शिकारीसाठी गोपनीय माहिती पुरवून त्याने कोट्यवधींची माया जमविली असून तो आंतरराष्ट्रीय टोळीसोबतदेखील संपर्कात असल्याचा संशय यंत्रणेला आहे.

Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
fraud with senior citizen, pretending army officer,
लष्करी अधिकारी असल्याच्या बतावणीने ज्येष्ठाची पाच लाखांची फसवणूक
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
Pune, girl call center was attacked, yerawada area
पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – चंद्रपूर : शेतकऱ्याने चक्क छत्रीच्या साहाय्याने वाघाला पळविले, जनावरांसह वाचविला स्वतःचा जीव

मागील आठवड्यात वाघाच्या शिकारप्रकरणी गडचिरोली चंद्रपूर येथून बावरिया टोळीतील १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान या शिकारीचे ‘कनेक्शन’ आसाम आणि दिल्लीपर्यंत असल्याचे समोर आले. धक्कादायक म्हणजे यात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण’ विभागातील सेवानिवृत्त अधिकारी मासराम जाखड (८२) याचे नाव आरोपी म्हणून पुढे आल्याने याप्रकरणाची व्याप्ती अधिकच वाढली आहे.

वीस वर्षांपूर्वी निवृत्त झालेला जाखड हा दिल्लीत वास्तव्यास आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘वन्यजीव गुन्हे नियंत्रण’ विभागात असताना त्याने वन्यजीव शिकार, तस्करी यासारख्या गुन्ह्यांवर काम केले आहे. यादरम्यान त्याचे शिकारी टोळीपासून अंतरराष्ट्रीय तस्करांशीदेखील संबंध आले. यातून मिळणारा पैश्याच्या लालसेने त्याने निवृत्तीनंतर विभागातील माहितीच्या आधारे शिकारीसाठी स्वतःचे ‘रॅकेट’ निर्माण केले. बावरियासारख्या कुख्यात टोळीच्या मदतीने तो दिल्लीत बसून वाघांच्या अवयवांची तस्करी करू लागला. गडचिरोली शिकारप्रकरणी नाव आल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाखड याच्या निवासस्थानी धाड टाकून महत्त्वाच्या दस्तावेजासह रोकडही जप्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य दिशेने तपास केल्यास मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड होऊ शकतो.

हेही वाचा – पश्चिम विदर्भात शिवसेना ठाकरे गटाला धक्का? अकोल्यातील मोठा गट शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात

याविषयी वनाधिकाऱ्यांना विचारणा केल्यास त्यांनी आरोपींना १४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिल्याचे सांगितले, परंतु अधिक बोलण्यास नकार दिला.

१० लखांपासून १० कोटीपर्यंत व्यवहार

तस्करांकडून कुख्यात बावरिया टोळीला एका शिकारीसाठी तब्बल १० लाख रुपये देण्यात येतात. पुढे आंतरराज्यीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांच्या अवयवांचा दर १० ते २० कोटींच्या आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात आसाम येथून जप्त करण्यात आलेली कातडी गडचिरोली येथील आंबेशिवणी परिसरातील वाघाची होती. तपासादरम्यान चंद्रपूर आणि गडचिरोलीतील ४ वाघांची शिकार या टोळीने केल्याचा खुलासा झाला आहे. पुढे तपासात हा आकडा वाढू शकतो.

Story img Loader