लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : पोलिसांनी एका अल्पवयीन मुलावर नजर ठेवून व्हेरायटी चौक ते कामठी असा पाठलाग केला. तो कामठीतील एका घरी जाताच पोलिसांनी धाड टाकून ९ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे २७ भ्रमणध्वनी जप्त केले. सुब्राती शेख (२०) रा. झारखंड आणि शेख खुशनसीब (१९) रा. बिहार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
झारखंडचे काही युवक नागपुरात आले असून भाड्याने खोली करून राहतात. कामाच्या शोधात आल्याचे सांगून लोकांची सहानुभूती मिळवतात. त्यांच्यासोबत अल्पवयीन मुले असतात. मात्र, त्यांच्यासाठी वेगळी खोली करतात. भ्रमणध्वनी गोळा झाले की झारखंडला कवडीमोल भावात विक्री करतात. जरीपटका येथील रहिवासी डॉ. रवी दासवानी (३६) हे मुंजे चौकातील हल्दीराम हॉटेलच्या बिल काऊंटरवर उभे असताना अज्ञात आरोपीने त्यांचा महागडा ॲप्पल कंपनीचा आयफोन चोरला. डॉ. दासवानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यासोबतच भ्रमणध्वनी चोरीच्या काही तक्रारी होत्या.
आणखी वाचा-संतापजनक! मित्राच्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार
पोलीस उपनिरीक्षक विजय नेमाडे आणि प्रवीण वाकोडे सीताबर्डी परिसरात वेगवगळ्या ठिकाणी थांबून संशयितांवर नजर ठेवली. एका अल्पवयीन मुलाचा पाठलाग केला आणि चोरीचा भंडाफोड झाला. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केली.
असा केला पाठलाग
सीताबर्डी परिसरात पोलिसांना एका अल्पवयीन मुलावर संशय आला. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. मुलगा एका बसमध्ये बसला. पोलीसही त्याच बसमध्ये बसले. तो मानकापुरात उतरला. तेथून ई-रिक्षाने ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत गेला. नंतर पुन्हा दुसऱ्या ऑटोने कामठीला गेला. पोलीस त्याच्या मागावरच होते. तो कामठीत ज्या घरी गेला, तेथे पोलीस पोहोचले. पोलिसांना पाहताच त्यांची तारांबळ उडाली. दोघांना पकडून घराची झडती घेतली असता महागडे भ्रमणध्वनी मिळाले.