नागपूर : केंद्र सरकार एकीकडे केंद्रीय वस्तू व सेवा करदाते वाढत असल्याचा दावा करते तर दुसरीकडे या विभागातील सर्व संवर्गातील रिक्त पदांचा आलेखही वाढताना दिसत आहे. त्यामुळे देशात करचोरी कशी थांबणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे (सीजीएसटी) एप्रिल-२०२४ मध्ये वस्तू आणि सेवा कर संकलन १२.४ टक्क्यांनी वाढून २.१० लाख कोटींवर पोहचले. हे आजवरचे सर्वोच्च मासिक संकलन आहे. मागील वर्षी, एप्रिल २०२३ मध्ये हे संकलन १.८७ लाख कोटी होते. नवीन करप्रणाली लागू झाल्यानंतर देशाने पहिल्यांदाच जीएसटी संकलनाचा मासिक २ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, ‘सीजीएसटी’मध्ये १ जुलै २०१४ रोजी सर्वच संवर्गात एकूण ७३ हजार ८१७ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे मंजूर होती. त्यापैकी ५२ हजार ५९ कर्मचारी कार्यरत तर २१ हजार ७५८ टक्के पदे रिक्त होती. त्यामुळे मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांचे प्रमाण २९.४७ टक्के होते. १ जुलै २०२३ रोजी या विभागात सर्व संवर्गातील मंजूर पदांची संख्या वाढून ९१ हजार ७४० वर गेली. त्यापैकी ५० हजार ६५९ पदे भरली तर ४१ हजार ८१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त पदांचे प्रमाण वाढून ४४.७७ टक्क्यांवर पोहचले आहे. विशेष म्हणजे, २०१४ च्या तुलनेत २०२३ मध्ये सीजीएसटीमध्ये सेवेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजारांनी कमी झाली आहे.

mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Mumbai, Capital Markets, Stock Indices, Sensex, Nifty, Federal Reserve, Jerome Powell, Jackson Hole Meeting, Domestic Institutional Investors, Foreign Institutional Investors,
तेजीवाल्यांची पकड घट्ट; ‘सेन्सेक्स’मध्ये शतकी वाढ
Vacancy of Doctor Posts in Health Department Mumbai print news
आरोग्य विभागाची खरेदी उदंड मात्र डॉक्टरांची पदे रिक्त!
rural health, primary health centers, Maharashtra, dilapidated, dangerous, monsoon leaks, health department, doctor accommodation,
आरोग्य विभागाची २०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रें धोकादायक ! डॉक्टरांच्या निवासाची अवस्था दयनीय…
thane aaple Sarkar centers marathi news
ठाणे: ‘आपले सरकार’ केंद्रांचा कारभार व्यवस्थापकाविना

हेही वाचा >>>चंद्रपूर : प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले, हत्या की आत्महत्या? संशय कायम

मागील वर्षात दोन लाख कोटींची करचोरी

२०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे २.०१ लाख कोटींची करचोरी झाल्याचा अंदाज आहे. ही रक्कम मागील आर्थिक वर्षातील गोळा झालेल्या एकूण वस्तू व सेवा कराच्या तुलनेत १० टक्के असल्याची माहिती ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम, सेंट्रल एक्साईज अँड जीएसटी, एस.सी./ एस.टी. इम्प्लाॅईज वेल्फेअर ऑर्गनायझेशनने दिली.

“केंद्र सरकार एकीकडे देशाची अर्थव्यवस्था व करदाते वाढत असल्याचे सांगते. दुसरीकडे मात्र सीजीएसटीमध्ये रिक्त पदांचा अनुशेष वाढत आहे. त्यामुळे देशात करचोरी थांबणार कशी, हा प्रश्न आहे. केंद्राने रिक्त पदे भरून करचोरीच्या वसुलीवर लक्ष द्यायला हवे.”- संजय थुल, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम, सेंट्रल एक्साईज अँड जीएसटी, एस.सी./ एस.टी. इम्प्लाॅईज वेल्फेअर ऑर्गनायझेशन.