नागपूर : सेमिनरी हिल्सवरील वनखात्याच्या अखत्यारितील बालोद्यानात लहान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र असणारी ‘वनबाला’ प्रदीर्घ कालावधीनंतर धावायला लागली. करोनाकाळात बंद करण्यात आलेली ही ‘टॉय ट्रेन’ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि बालोद्यानातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

डिसेंबर १९७८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते ही ‘टॉय ट्रेन’ सुरू करण्यात आली आणि ‘वनबाला’ असे तिचे नामकरण करण्यात आले. चिमुकल्यांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली ही वनबाला त्यानंतर सातत्याने बंद पडत राहिली. फार कमी कालावधीसाठी सुरू आणि दीर्घकालावधीसाठी बंद असे तिचे स्वरूप राहिले. त्यामुळे चिमुकल्यांनीही त्याकडे पाठ फिरवली. करोनाकाळाच्या आधी सुरू झालेली ‘वनबाला’ करोनामुळे पुन्हा एकदा बंद झाली. करोनाचे सावट निघाले, पण वनखात्याने ती सुरू करण्यासाठी फार उत्साह दाखवला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यात बिघाड झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही ‘टॉय ट्रेन’ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. तिच्या दुरुस्तीकरिता आवश्यक असलेले अनुदान जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून देण्यात आले आणि मध्य रेल्वे विभागाने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला

हेही वाचा – लोकसत्ता इम्पॅक्ट : माजी जि.प. अध्यक्षाच्या पुत्रावर ‘अट्रोसिटी’चा गुन्हा दाखल, महिला सरपंचाला शिवीगाळ करणे भोवले

‘टॉय ट्रेन’च्या आतील तांत्रिक संरचना, तिची रंगरंगोटी, रुळ दुरुस्ती आदी आवश्यक कामांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर त्याची दोनदा चाचणीसुद्धा घेण्यात आली. त्यानंतर गुरुवारी ही ४५ वर्षांची ‘वनबाला’ अडीच किलोमीटर धावली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मंडळ रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे, वनसंरक्षक (प्रादेशिक) श्रीलक्ष्मी ए., उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल सुद यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी चिमुकल्यांसह ज्येष्ठांनीदेखील ‘वनबाला’ची सफर केली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सारिका वैरागडे, वनपाल अशोक गडे, वनरक्षक श्री. पांचाळ, मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर तसेच यासंदर्भातील समितीचे अशासकीय सदस्य विनीत अरोरा, विनीत ठाकरे, विवेक नागभिरे उपस्थित होते.

हेही वाचा – वर्धा : नाराज काँग्रेस जिल्हाध्यक्षांची संमेलनास दांडी, म्हणतात तब्येत बिघडली…

बालोद्यानातील ‘वनबाला’चा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी मध्य रेल्वेचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग सरसावले आहेत. नवीन स्लीपरने सुसज्ज अंदाजे १८०० मीटरचा नवीन ट्रॅक आधीच टाकण्यात आला आहे. याठिकाणी वनबालाचे निवासस्थान, तिचे प्रवेशद्वार, तिकीटघर यासह आवश्यक ते बांधकाम करण्यात येणार आहे.