बुलढाणा : महाविकास आघाडीचा राजकीय कर्दनकाळ ठरत आलेल्या वंचित बहुजन आघाडीने हा लौकिक यंदाही कायम ठेवला. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात पाऊण लाखापेक्षा जास्त मतदान घेणाऱ्या वंचित आघाडीच्या मतांनी चार मतदारसंघातील निकालात निर्णायक भूमिका पार पाडली आहे. याचा फटका अप्रत्यक्षपणे का होईना आघाडीच्या उमेदवाराना बसला आहे.

वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील सातही मतदारसंघात उमेदवार दिले होते. या सात उमेदवारांनी ७८ हजार ५५८ मते घेतली. यातील चिखली मतदारसंघातील उमेदवार सिद्धेश्वर पवार (१३०८ मते), मेहकर मधील डॉक्टर ऋतुजा पवार ( २०५४) यांना नाममात्र मतदान मिळाले. या तुलनेत पाच मतदारसंघातील उमेदवारांनी चांगली मते घेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मतांचे समीकरण बिघडवून टाकले! बुलढाणा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या अर्थात आघाडीच्या उमेदवार या जिल्ह्यात सर्वात कमी( ८४१) मतांनी पराभूत झाल्या. इथे वंचितचे प्रशांत वाघोदे यांनी ७१४६ मते घेतली . त्यामुळे आंबेडकरी मतांचे झालेले विभाजन निकालात निर्णायक ठरले. खामगाव मध्ये वंचित चे देवराव हिवराळे यांनी २६ हजार ४८२ मते घेतली. याचा फटका काँग्रेसचे दिलीप सानंदा यांना बसला.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
ST seeks UPI solution to holiday money dispute Mumbai news
सुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Narendra Modi JP Nadda
भाजपावर मतदारांसह देणगीदारांचीही कृपा, वर्षभरात तब्बल ३,९६७ कोटींच्या देणग्या, ८७ टक्के वाढ
waqf board amendment bill 2024
Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातल्या बैठकीत सत्ताधाऱ्यांच्या १२ सुधारणा मंजूर, विरोधकांच्या सर्व सुधारणा फेटाळल्या!

हेही वाचा…‘एमपीएससी’कडून परीक्षांच्या वेळापत्रकाचे पालन होते का? २०२४ च्या किती परीक्षा प्रलंबित…

भाजपचे आकाश फुंडकर यांच्याकडून त्यांना २५ ४७७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला हे विशेष. मलकापूर मध्ये वंचित चे डॉक्टर मोहम्मद जमिर यांनी ९३१६ मते घेत काँग्रेसच्या पराजयात मोठा वाटा उचलला. जळगाव मध्ये वंचितचे डॉक्टर प्रवीण पाटील यांनी १७६४८ मते घेतल्याने काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या पराभवमध्ये भर पडली. सिंदखेडराजा मध्ये वंचितच्या सविता मुंडे यांनी १६६५८ मते घेतल्याने तिरंगी लढतीत मोठा उलटफेर झाला. आघाडीचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या अनपेक्षित पराभवाला त्यांनी मोठा हातभार लावला.

हेही वाचा…काँग्रेसच्‍या नेत्‍यांनी बंडखोराला रसद पुरवली, ‘या’ पराभूत उमेदवाराचा आरोप

११५उमेदवारांना नकार

यंदाच्या लढतीत सात जागासाठी ११५ उमेदवार रिंगणात होते. मलकापूर मध्ये १५ बुलढाणा १३ चिखलीत २१ सिंदखेडराजा १७ मेहकर १९ ,खामगाव १८, तर जळगाव मतदारसंघात ९ उमेदवार मैदानात उतरले होते. आघाडी , युती, वंचित, बसपा, अन्य पक्ष आणि मोठ्या संख्येतील अपक्ष असे पर्याय मतदारांना उपलब्ध होते. या उप्परही ६३९४ महाभाग मतदारांनी ‘नोटा’ ला पसंती देत नकारात्मक मतदान केले. ८४१ मतांनी फैसला लागलेल्या बुलढाण्यात नोटा चे प्रमाण सर्वाधिक म्हणजे १३५४ इतके आहे. मलकापूर मध्ये १०४५, चिखली मध्ये ३३१,सिंदखेडराजात ७४२,मेहकर ४६७,खामगाव ११३६ तर जळगाव मध्ये १३१९ मतदारांनी नोटा दाबण्यात धन्यता मानली.

Story img Loader