अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तप्त झाले. अकोला लोकसभा मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वंचित आघाडी जोमाने तयारीला लागली. नवीन वर्षाला सुरुवात झाल्याने वंचित आघाडीने ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या छायाचित्रासह ‘नवे वर्ष, नवे खासदार’ असे फलक लावून मतदारांचे लक्ष वेधून घेतले. वंचितच्या या फलकबाजीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी केली. अकोल्यात भाजप व वंचित आघाडीकडून निवडणुकीच्या तयारीवर भर दिला जात आहे. अकोला मतदारसंघ भाजपचा अभेद्य गड असून सलग २० वर्षांपासून माजी राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे प्रतिनिधित्व करीत आहेत. भाजपसमोर आव्हान उभे करण्यासाठी वंचित आघाडी मैदानात उतरली आहे.

हेही वाचा… विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी…

लोकसभा निवडणूक लढण्याच्या घोषणेमध्ये सुद्धा वंचितने आघाडी घेतली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी भेटीगाठी, कार्यक्रम, सभांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार मोहिमेला राबवली. वंचित इंडिया आघाडीत जाण्यासाठी इच्छूक असली तरी अद्याप त्याचा निर्णय झाला नाही. वंचितने स्वबळावर तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोला शहरात नववर्षात फलकबाजी करण्यात आली आहे. या फलकावर वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे छायाचित्र टाकून ‘नव वर्ष, नवे खासदार’ असा मजकूर टाकण्यात आला आहे. आगामी तीन-चार महिन्यात होणारी लाेकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन वंचितने ही फलकबाजी केली. या फलकांची शहरात चांगलीच चर्चा होत आहे.

ॲड. आंबेडकर सलग अकराव्यांदा रिंगणात

परंपरागत अकोला लोकसभा मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. १९८४ पासून ॲड. आंबेडकर सातत्याने अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. आता २०२४ मध्ये सलग अकराव्यांदा ते येथून आपले नशीब आजमावणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aaghadi prakash ambedkar new year new mp banners for the upcoming lok sabha elections in akola ppd 88 dvr
Show comments