अकोला : वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची दुसरी यादी रविवारी सायंकाळी जाहीर केली. यामध्ये उमेदवारांच्या जातीचा देखील उल्लेख केला असून विविध जातींना प्रतिनिधित्व दिले आहे. वंचितने पाहिल्या यादीत आठ मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले होते. कोल्हापूर आणि नागपूर येथे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर वंचित आघाडीने रविवारी सायंकाळी ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हिंगोलीमधून डॉ. बी. डी. चव्हाण, लातूर नरसिंहराव उदगीरकर, सोलापूर राहुल गायकवाड, माढा रमेश बारसकर, सातारा मारुती जानकर, धुळे अब्दुल रहेमान, हातकणंगले दादासाहेब पाटील, रावेर संजय ब्राह्मणे, जालना प्रभाकर बकले, उत्तर मध्य मुंबई अब्दुल खान व रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-03-2024 at 22:02 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi declare candidate second list for lok sabha election ppd 88 zws