अकोला : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना हादरे बसले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये अनेक ठिकाणी नव्यांना संधी मिळाली आहे. काही जागांवर प्रस्थापितांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. निकाल जाहीर होताच राजकीय पक्षांनी विजयी उमेदवारांवर दावे-प्रतिदावे सुरू केले आहेत. जिल्ह्यात वंचितने वर्चस्व राखले असून त्याखालोखाल भाजपला जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा >>> ‘हॅलो…मी आत्महत्या करतोय! तुम्‍ही पोलीस आहात ना, मग मला शोधून काढा’; अमरावती पोलिसांना अज्ञात व्यक्तीचा फोन

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

जिल्ह्यात ५३२ पैकी २६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. अकोट तालुक्यातील धामणगाव ही एकमेव ग्रामपंचायत संपूर्ण बिनविरोध (सरपंच व सदस्य) झाली. सरपंचपदासाठी २५८ जागांसाठी ९३६, तर ग्रामपंचायत सदस्यांसाठी १५२० पदासाठी ३८६७ उमेदवारांनी निवडणूक लढली. या निवडणुकीसाठी एकूण ८३२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पात्र तीन लाख सात हजार ६४० मतदारांपैकी दोन लाख ४६ हजार ९७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ८०.२८ टक्के होती. तेल्हारा तालुक्यात ८१.१७, अकोट ८०.५६, मूर्तिजापूर ७६.७८, अकोला ७९.२५, बाळापूर ८३.२९, बार्शिटाकळी ८१.१४ व पातूर तालुक्यात ८३.१६ टक्के मतदान झाले. ग्रामपंचायत सदस्य व सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीला मंगळवारी सकाळी प्रारंभ झाला.

हेही वाचा >>> Gram Panchayat Election Result 2022: भाजपा म्हणाली “आम्ही १ नंबरचा पक्ष”; उद्धव ठाकरे म्हणाले “हा बालिशपणा…”

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. जिल्ह्यात सकाळपासूनच एक-एक निकाल समोर येण्यास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे, तर काही जागा कायम राखण्यात तेथील प्रस्थापितांना यश आल्याचे चित्र आहे. बहुतांश ठिकाणी नव्या चेहऱ्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंच जनतेतून निवडण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. वंचित बहुजन आघाडीने सरपंचपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. तो त्यांच्या पथ्यावर पडला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व असलेल्या वंचित आघाडीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच व सदस्यांच्या निवडीमध्येही आपला दबदबा कायम ठेवला. जिल्ह्यात सर्वाधिक सरपंच व सदस्य आमचे निवडून आल्याचे वंचित आघाडीचे म्हणणे आहे. १२३ ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ६२७ ग्रामपंचायत सदस्य विजयी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. मनसेने जिल्ह्यात खाते उघडले असून एका ठिकाणी सरपंच निवडून आले आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला काही निवडक ठिकाणी यश मिळाले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.