बुलढाणा: बुलढाण्याची जागा लढण्याच्या तयारीला लागलेल्या शिवसेना (उबाठा) सह आघाडीचे लक्ष वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे लागले आहे. निवडणूक जाहीर झाल्यावरही वंचित कडून महाविकास आघाडी च्या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे आघाडीत अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> ११ आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकाचे निधन, श्रद्धांजली वाहताना नितीन गडकरी म्हणाले…
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढतींचा नव्वदीच्या दशकांपासूनचा इतिहास लक्षात घेतला तर थेट दुहेरी लढती झाल्या आहे. मात्र रिंगणातील भारिप बमसं, बसपा, रिपाइं मुळे झालेल्या धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन झाले अन त्याचा फटका आघाडीला बसला. याला सन २०१९ मधील लढत देखील अपवाद नाही. पुलवामा, नरेंद्र मोदिंची लाट या घटकाईतकाच, मत विभाजन निर्णायक घटक ठरला. सलग तिसरा विजय मिळविताना जाधव यांनी पाच लाखांचा आकडा ओलांडला. त्यांना ५ लाख २१ हजार ९७७ मते मिळाली होती. आघाडीचे राजेंद्र शिंगणे यांनी ३ लाख ८८ हजार ६९० मते प्राप्त झाली. वंचित ने ऐन वेळी मैदानात उतरविलेले आमदार बळीराम शिरस्कार यांनी १ लाख ७२ हजार ६२७ मते घेत मोठा उलटफेर केला. शिंगणे व शिरस्कार यांच्या मतांची बेरीज जाधव यांच्यापेक्षा जास्त होती. यामुळे कोणत्याही लाटे पेक्षा मत विभाजन निर्णायक घटक ठरला.
हेही वाचा >>> जेव्हा सरकारी वकीलालाच करावा लागला सरकारचा विरोध, उच्च न्यायालयात घडला मजेदार प्रसंग…
यंदा ठाकरे सेना किंबहुना आघाडीत सध्या असलेल्या राजकीय अस्वस्थता किंवा धास्तीचे मूळ मागच्या लढतीत दडले आहे. वंचित ची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत ती कायम राहणार आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, वंचित च्या वरिष्ठ सूत्रांनी ,’ येत्या दोन तीन दिवसांत आमचा निर्णय कळेल’, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. यामुळे आघाडीतील धाकधूक काही तास कायम राहणार असे मजेदार चित्र आहे.
‘बी प्लॅन’? दरम्यान वंचित चा होकारच काय नकार सुद्धा न आल्याने आघाडी प्रामुख्याने ठाकरे सेनेची धाकधूक वाढली आहे. ‘एकदाचा त्यांचा निर्णय आला तर आम्हाला काय ते नियोजन करता येईल. दुर्देवाने युती नाही झाली तर वेगळा ‘प्लॅन’ करावा लागेल’, ही आघाडीच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया बोलकी आणि अस्वस्थता दर्शविणारी आहे.