अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त असल्याचे येथे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाल्यास वंचित आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी मंगळवारी दिली.
हेही वाचा >>> धक्कादायक! विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, ग्रामसेवकाकडून दहा हजारांची…
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. ही रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी देखील केली. दरम्यान, ही निवडणूक जाहीर झाल्यास ती लढण्याची तयारी वंचित आघाडीने केली आहे. याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने घेतला. या संदर्भात उमेदवारी निवडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल, असे पुंडकरांनी सांगितले.