अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने पुढचे पाऊल टाकले आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असतांनाच वंचित आघाडीने आपल्या ११ उमेदवारांची पहिली यादी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने शनिवारी दुपारी जाहीर केली. निवडणुकीच्या दृष्टीने वंचितच्या तयारीला वेग आला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. लवकरच निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून संघटनात्मक बांधणीसह मोर्चेबांधणी केली जात आहे. सर्वपक्षीय इच्छूक कामाला लागले असून जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का घसरला.

sharad pawar road show chinchwad assembly constituency rahul kalate
भाजपच्या चिंचवडच्या गडात शरद पवार यांचा पहिल्यांदाच रोड-शो; नागरिकांचा प्रतिसाद
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Campaigning of NCP Sharad Pawar party candidate Subhash Pawar by Shiv Sena local office bearers
शिवसैनिकांकडून विरोधी उमेदवाराचा प्रचार; महिला कार्यकर्त्यांच्या चित्रफिती प्रसारीत, महायुतीत एकवाक्यता नाहीच
BJP, Vanchit bahujan aghadi, Murtizapur constituency
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
BJP rebel Varun Patils decision to work for mahayuti in Kalyan
कल्याणमध्ये भाजप बंडखोर वरूण पाटील यांचा महायुतीचे काम करण्याचा निर्णय
Vanchit Aghadis support for Harish Alimchandani is problems for BJP and Congress
भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराला वंचितचे बळ, ‘कोणाच्या’अडचणी वाढणार…

हेही वाचा >>> बाप रे…पहिल्या वर्गातील मुलाला बिबट्याने दातात धरले  आणि…

वंचित आघाडीचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना स्वत: पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. या अपयशाला झटकून वंचित आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमधून वंचित आघाडीने इच्छुकांचे अर्ज मागवले होते. त्यानंतर आता वंचित आघाडीने ११ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. महायुती व मविआमध्ये जागा वाटपावरून ओढाताण सुरू असून अंतर्गत वाद वाढले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वंचितने थेट उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे. 

हेही वाचा >>> राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….

उमेदवार कोण ?

वंचितने वाशीम विधानसभा मतदारसंघामधून मेघा डोंगरे, सिंदखेडराजामधून सविता मुंढे, रावेर शमिभा पाटील, धामणगाव रेल्वे निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षित-पश्चिम विनय भांगे, साकोली अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण फारुक अहमद, लोहा शिवा नरंगले, छत्रपती संभाजीनगर पूर्व विकास दांडगे, शेवगाव किसन चव्हाण व खानापून विधानसभा मतदारसंघातून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  

उमेदवारांच्या जातीचा उल्लेख

वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना त्यामध्ये संबंधितांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे. या अगोदर लोकसभा निवडणुकीत वंचितने उमेदवारांसोबत त्यांची जात सुद्धा जाहीर केली होती. तोच कित्ता विधानसभा निवडणुकीत वंचितने गिरवला. वंचितने सर्वसमावेशक उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. वंचितकडून लवकरच आणखी काही उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.