गोंदिया : नागपूर येथील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी वंचितचा पाठिंबा मागितला आणि वंचितने दिला. नागपूर हे आरएसएसचे मुख्यालय आहे म्हणून भाजपचे नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी वंचितने काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला यावर नाना पटोलेंकडून स्वागत अपेक्षित होते पण त्यानंतर पटोले यांनी असे बेताल वक्तव्य केले की नितीन गडकरी तर नागपूरमधून हरणारच आहेत, वंचितने आम्हाला पाठिंबा का दिला ? यावरून असे स्पष्ट होते की नितीन गडकरीचा पराभव झाला तर याचा सर्वात जास्त दुःख नाना पटोले यांना होईल असा वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी केलं आहे.
ते गोंदिया भंडारा चे वंचितचे उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारार्थ आल्यानंतर माध्यमांशी बोलताना केले. पटोले यांच्यावर टीका करताना बनसोडे म्हणाले की येथून स्वत: रणछोडची भूमिका घेतली आणि काँग्रेसतर्फे डमी उमेदवार माथी मारला. ही सरळ सरळ भाजपला मदद करण्याची खेळी आहे. त्यानंतर ही पटोले येथेच न थांबता ते बंद द्वार भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांच्याशी चर्चा केली. भाजपचे विजय शिवणकर यांच्याशी बंद द्वार चर्चा केली,तसेच भाजप समर्थक गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल याच्याशी पण बंद द्वार चर्चा केली. याचे त्यांनी जनतेला त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.
हेही वाचा…अकोल्यात तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?
त्यांच्या या बंद द्वार चर्चा वरून गोंदिया भंडारा ची जागा सरळ भाजपला आंदण देण्याची कृती नाना पटोले करीत असल्याचा आरोप ही वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी केलं. त्यामुळे वंचित चे उमेदवार संजय केवट यांना मतदान करण्याचे आवाहन गोंदिया भंडारा जिल्ह्यातील जनतेला त्यांनी केले.