लोकसत्ता टीम
नागपूर: शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे बुधवारी नागपुरात येत असून त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार आहे. त्यामुळे भिडे यांना विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
आणखी वाचा- नागपूरच्या रुंद रस्त्यांवरील ‘हे’ फिरते अडथळे पार करायचे कसे?
भिडे आज ( बुधवारी) संघटनांच्या बैठकीसाठी नागपुरात येत आहेत. भीमा कोरेगाव दंगल घडवण्यात भिडे यांचा हात असल्याचा वंचितचा आरोप आहे. भिडे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत, असे वंचित आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी सांगितले.आघाडीतर्फे सुभाष रोड वरील आग्याराम देवी चौक येथे गीता मंदिर जवळ आज सायंकाळी काळे झेंडे दाखवून विरोध प्रदर्शन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.