नागपूर: वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी संभाजी भिडे यांच्या विरोधात गीता मंदिर जवळ निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बुधवारी सायंकाळी नागपूरमधील गीता मंदिरात संभाजी भिडे यांचा कार्यक्रम होता. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे मंगळवारी वंचित बहुजन विकास आघाडीने भिडेंना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा >>> अतिवृष्टीनंतर वेदनांचा पूर; नव्याने संसार उभारण्याचे आव्हान
२०१८ मध्ये झालेल्या भिमा -कोरेगाव दंगल प्रकरणात भिडे यांचा हात होता,असा आरोप आघाडीने केला आहे. संध्याकाळी कार्यक्रम स्थळाजवळ वंचितचे कार्यकर्ते जमले व त्यांनी भिडेंच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळाने भिडे कार्यक्रमस्थळी आले.
First published on: 26-07-2023 at 20:26 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi workers protest against sambhaji bhide in nagpur cwb 76 zws