नागपूर : सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावू लागली आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रेल्वेगाडीला नागपूर येथे हिरवा झेंडा दाखवला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… अमरावतीत ‘गन कल्चर’ फोफावतेय; ‘पिस्‍तूल’बाज तरुणांचा दर्यापूरच्या बाजारात मध्यरात्री ‘मॉकड्रिल’! ‘ते’ तरुण कोण?

अशाप्रकारची ही देशातील सहावी रेल्वेगाडी तर मध्य भारतातील पहिलीच गाडी आहे. ही गाडी नागपूर-बिलासपूर हे ४१२ किलोमीटरचे अंतर केवळ साडेपाच तासात कापते. वंदे भारत एक्सप्रेस संपूर्णपणे वातानुकूलित असून पुढील स्थानकाची माहिती देणारी ‘डिजिटल स्क्रीन’ बसवण्यात आली आहे. या गाडीत खानपानची देखील सुविधा आहे. ही गाडी आठवड्यातून सहा दिवस धावते. केवळ शनिवारी ही गाडी धावत नाही.

हेही वाचा… गडचिरोली : भूमाफियांचा प्रताप; वनविभागाच्या जमिनीवर लेआऊट टाकले, अन्…

आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्सप्रेसवर छत्तीगसड येथील दुर्ग ते भिलाई स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने दगड फेक केली. त्यामुळे या गाडीच्या एका खिडकीचे काच फुटले याबाबत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी साकेत म्हणाले, अज्ञात व्यक्तीने धावत्या गाडीवर दगड फेकला असावा. त्याची चौकशी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande bharat express window glass damage in stone pelting rbt 74 asj