बुलढाणा : मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांच्या उपोषणवरून घमासान सुरू असून मुख्यमंत्री अडचणीत आले आहे. या धामधुमीत वीरशैव लिंगायत समाज धर्मगुरूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरशैव लिंगायत मठांचा तिर्थक्षेत्र आराखड्यात समावेश करावा या मुख्य मागणीसह ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, विरशैव लिंगायत धर्मगुरू, शिवाचार्य हे धर्म जागरणासाठी देशाटनावर असताना त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. बुधवारी, १ नोव्हेंबर रोजी ही भेट पार पडली.

हेही वाचा – अकोला : मराठा आंदोलनात वंचित आणि शिवसेनेमध्ये जुंपली, ‘या’ दोन आमदारांमध्ये बाचाबाची

श्रीगुरू काशिनाथ शिवाचार्य पाथरी, दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत? महादेव शिवाचार्य महाराज वाईकर, विरूपाक्ष शिवाचार्य मांजरसुंभा, सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरा, मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा, सोमलिंग शिवाचार्य, बिचकुंदा यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

यावेळी धर्मगुरूंनी संपूर्ण महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत समजाचे अडीचशेवर मठ असून सात लाखांच्या वर शिष्य असल्याचे सांगितले. साखरखेर्डा येथील मठ हा एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. हा मठ तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व मठांना तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात समाविष्ट करून घ्यावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. पैशांअभावी अनेक पौराणिक मठ कालौघात नामशेष होत चालले आहेत. अनेक मठात मोफत पाठशाळा, गोशाळा, गुरूकूल चालविण्यात येतात यामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, आर्थिक चणचण असल्याने मठांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. देशातील कानाकोपऱ्यातून सणोत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात या मठांचा समावेश झाल्यास हा धार्मिक ठेवा चिरकाल टिकून राहील असे लक्षात आणून दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा प्रश्न धसास लावण्याची ग्वाही दिली.

हेही वाचा – मराठा आंदोलनाची धग : यवतमाळ जिल्ह्यातील मार्गांवर प्रतिबंधात्मक आदेश

समाजाचे संत शिरोमणी मन्मत स्वामी यांच्या कपिलधार यात्रेत शासकीय महापुजेचे तथा साखरखेर्डा येथील जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी पिठाच्या भेटीचे निमंत्रण यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले. भेटीचे नियोजन पाथरीचे शिंदे गटाचे नेते शेख सय्यद खान, काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veerashaiva lingayat samaj priests met the cm eknath shinde scm 61 ssb
Show comments