बुलढाणा : समृद्धी महामार्ग आणि जीवघेणे अपघात हे समीकरण आता नवीन नाही. मात्र, आज शुक्रवारी दुपारी झालेला विचित्र मत्स्य अपघात चर्चेला कारणीभूत ठरला आहे.
हेही वाचा – चंद्रपूर : सायली, आकाशसोबत विद्यार्थ्यांनी धरला ठेका
प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर मेहकरपासून २५ किलोमीटर अंतरावर डोणगावनजीक हा अपघात झाला. पश्चिम बंगालची (डब्ल्यू. बी. २५ के ८२८६ क्रमांकाची) मालमोटार मासे घेऊन जात असताना या वाहनाला अपघात झाला. यामुळे हे वाहन पलटले. त्यामुळे त्यातील मासे मार्गावर विखुरले. सर्वत्र माशांचा खच पडला. या अपघाताची माहिती पसरताच मासे गोळा करण्यासाठी युवक व ग्रामस्थांची झुंबड उडाली. अपघातस्थळी ‘पळा पळा पुढे कोण पळे’ असे चित्र निर्माण झाले. यामुळे जीव वाचल्याचा आनंद मानावा की, माशांच्या राजरोस अपहरणाचे दुःख मानावे, असा प्रश्न बंगाली चालकासमोर पडला.