समृद्धी महामार्गावर अतिवेगात गंतव्यावर पोहचलेल्या वाहनांना म. रा. रस्ते विकास महामंडळ मर्या.च्या (एमएसआरडीसी) स्वयंचलित यंत्रणेकडून सोमवारी प्रतिबंध घालण्यात आला. नागपूर आणि औरंगाबादला १२४ ते १२६ किलोमीटर प्रतितास धावलेल्या दोन वाहनांवर प्रथमच अशी कारवाई करण्यात आली.

ही कारवाई झालेल्या पहिल्या वाहनाचा क्रमांक एमएच २३, एआर ८१०० होता. या वाहनाने जालनाहून समृद्धी महामार्गावर प्रवास सुरू केला व पथनाक्यापर्यंतचा प्रवास १२४ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने केला. विशेष म्हणजे, हे वाहन मध्ये सुमारे २० मिनिटे इंधन भरण्यासाठी थांबले होते. त्यानंतरही वाहनाचा वेग १२४ किलोमीटर असल्याचे स्पष्ट झाल्याने हे वाहन दीडशेहून जास्त गतीने धावल्याचा अंदाज आहे. दुसरी कारवाई नागपूरहून औरंगाबादला गेलेल्या एका चारचाकी (वाहन क्रमांक- केए ४२, ए१४१८ ) वाहनावर झाली. हे वाहन येथून निघून औरंगाबादला १२६ किलोमीटर प्रतितास वेगाने पोहचले. या दोन्ही वाहनांच्या चालकांचे सक्तीने समुपदेशन करण्यात आले. त्यांच्याकडून नियम पाळण्याबाबतचे शपथपत्रही घेतले गेले. याबाबत माहिती देताना, नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण म्हणाले, नागपुरात यापुढे अतिवेगाने वाहन धावताना दिसल्यास कडक कारवाई केली जाईल.

Bus Passenger Thrashes Conductor After argument over change money
नागपूर : सुट्या पैशांवरून बाचाबाची; एसटी बसच्या वाहकाला मारहाण…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
mahakumbh 2025 Guidlines
Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ परिसरात वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द; चेंगराचेंगरीनंतर सरकारने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे!
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
Palghar Police conducts special awareness campaign on the occasion of Road Safety Week
शहरबात: रस्ते आणि सुरक्षा
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
Scam in contract bus process Inquiry committee recommends to Chief Minister to cancel tender Mumbai new
एसटी बस निविदेत घोटाळा नव्याने प्रक्रिया राबविण्याची शिफारस; मुख्यमंत्र्यांचे निर्णयाकडे लक्ष
Missing tempo driver, Narayangaon accident,
पुणे : नारायणगाव अपघात प्रकरणातील पसार टेम्पोचालक गजाआड, एसटी बसचालकही अटकेत

हेही वाचा >>>अबब… १२० किलोचे कासव; “तो” आमच्या देवाचा, आमच्या तलावात परत सोडा

वेगमर्यादा निश्चित

शासनाने समृद्धी मार्गावर कारची वेग मर्यादा १२० किमी प्रतितास, ट्रकची ८०, बसची १००, टँकरची ६० किमी प्रतितास निश्चित केली आहे.

२० प्राणांतिक अपघात

समृद्धी महामार्गावर २२ प्राणांतिक अपघात झाले असून त्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील २२.७२ टक्के अपघात टायर फुटून, २७.२७ टक्के अपघात पुढच्या वाहनाला धडक देऊन, १८.१८ टक्के अपघात चालकाला डुलकी आल्याने झाले. अतिवेगाने वाहन चालवून ९.०९ टक्के आणि इतरही कारणाने प्राणांतिक अपघात नोंदवले गेले.

Story img Loader