समृद्धी महामार्गावरून १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवता येणे शक्य असल्याचा अहवाल आयआयटी, मुंबईने दिले होता. परंतु या महामार्गावर अपघातांची मालिका बघता सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावर १२० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ११ डिसेंबर २०२२ला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते.

११ डिसेंबरपासून आजवर सहा अपघात झाल्याचे नाना पटोले यांनी सभागृहात सांगितले. त्यावर मंत्री शंभू राजे देसाई यांनी या महामार्गाचा आराखडा आणि जाडी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. आयआयटी मुंबईने तर यावर १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवता येईल, म्हटले आहे. परंतु आपण त्यावर १२० किमी प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित केली आहे. तसेच समृद्धी मार्गावर गस्त घालणारी वाहनांची संख्या वाढवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: समृद्धी महामार्गावर पुरेशा सुविधा उपलब्ध, प्रवासातील गैरसोयीच्या तक्रारींनंतर एमएसआरडीसीचा दावा; गेल्या सात दिवसात ५० हजार….

इतर मार्गांवरील आधीच्या काही घटनांमध्ये यवतमाळ येथून मुंबईला निघालेल्या एका खासगी बसला नाशिक येथे ८ ऑक्टोबर २०२२ ला पहाटे अपघात झाला. त्यात होरपळून १२ प्रवासी ठार तर ४३ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. तसेच नाशिक-पुणे राजगुरूनगर येथून नाशिकडे निघालेल्या एसटी बस उभ्या बसबर आदळली. पुण्याकडून येणाऱ्या बसला आग लागून दोघांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले होते.

हेही वाचा: “आली आली समृद्धी!” समृद्धी महामार्गावर आधारित अवधूत गुप्तेने गायलं गाणं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाला, “महाराष्ट्राची ताकद आता…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री शभू राजे म्हणाले, यवतमाळ येथून निघालेल्या बसचा अपघात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने झाला. वाहन चालकांवर कारवाई झाली. तसेच रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. रस्ता अपघात झालेल्यांच्या आरोग्य सुविधेसाठी ६३ ट्रामा केअर आहेत. ते आता ७५ करण्यात येणार आहेत. खासगी बसगाड्यांच्या तपासणीसाठी परिवहन खात्याच्या भरारी पथकांना सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकसत्ता टीम