नागपूर : समृद्धी महामार्गावर रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर प्रतिबंध लागणार आहे. त्यापूर्वी सोमवारपासून दोन दिवस आरटीओ अधिकारी रिफ्लेक्टरचे पेंट घेऊन समृद्धीवर तैनात आहे. हे अधिकारी स्वत: संबंधित वाहनाला रिफ्लेक्टर पेंट लावत आहे. या वाहनांवर प्रत्येकी एक हजारांचा दंडही आकारला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना रेडियम अथवा पेंट असलेले रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे. या रिफ्लेक्टरमुळे मागील वाहनास पुढील मालवाहू वाहन स्पष्ट दिसत असल्याने अपघाताची शक्यता कमी होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यापूर्वी शुभारंभ झालेल्या समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. येथील अपघात नियंत्रणासाठी नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयाने सोमवारी समृद्धीवर रिफ्लेक्टर असलेल्या पेंट घेऊन हजेरी लावली. सकाळपासून दुपारी दीड वाजतापर्यंत सुमारे २० रिफ्लेक्टर नसलेली वा त्यात दोष असलेल्या वाहनांना आरटीओच्या वायूवेग पथकाने रोखले. या वाहनांवर प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारला गेला. त्यानंतर आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्वत:कडील रिफ्लेक्टर पेंट या वाहनांवर मारून हे वाहन पुढे सोडले.

हेही वाचा – अमरावती विद्यापीठातील विविध पदांच्या भरतीची दिशाभूल करणारी जाहिरात समाज माध्‍यमांवर

सध्या ही कारवाई सौम्य असली तरी दोन दिवसानंतर घासलेल्या टायर प्रमाणेच रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना या महामार्गावर प्रवासात प्रतिबंध घालले जाणार असल्याचे नागपूर ग्रामीणचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, प्रथमच आरटीओकडून रिफ्लेक्टर पेंट वाहनांना लावले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.