नागपूर : ज्येष्ठ नेपथ्यकार, रंगकर्मी आणि दिग्दर्शक गणेश नायडू यांचे मंगळवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात तुषार व हेमंत ही दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा स्मशान घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार आणि दिग्दर्शक अशा सर्वच क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेले गणेश नायडू यांनी १९५४ पासून नाट्य क्षेत्राशी जुळले.
हेही वाचा >>> मूर्तिकार व्यावसायिक झाले अन् मूर्तींमधील कलात्मकता संपली! ; ज्येष्ठ शिल्पकार व माजी आमदार दीनानाथ पडोळे यांची खंत
ते या रंजन कला मंदिराचे आजीव सदस्य होते. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. एकूण ८५ नाटकांचे, ४६ एकांकिकेत नेपथ्य व प्रकाशयोजना, ३५ नाटकात भूमिका केल्या, १९ नाटकाचे व ८ एकांकिकेचे दिग्दर्शन, ५ बालनाट्याचे नेपथ्य व प्रकाशयोजना त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.