लोकसत्ता टीम
नागपूर: ज्येष्ठ भाषा व लिपी तज्ज्ञ, साहित्यिक दिवाकर मोहनी यांचे सोमवारी रात्री निधन झाले ते ९२ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सोमवारी रात्री त्यांचे धरमपेठ खरे टाऊन येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता . त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका सुनंदा. मुलगी अनुराधा मुलगा भरत व मोठा आप्त परिवार आहे.
मोहनी यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३१ रोजी नागपुरात गांधीवादी कुटुंबात झाला. आजचा सुधारक या विवेकवादी नियतकालिकाचे ते संपादक व प्रकाशक होते .त्यांनी स्त्री स्वातंत्र्य, धर्म, संपत्तीचे मोल आदी विषयावर विवेकवादी अंगाने लेखन केले. देवनागरी लिपीवरील त्यांचे ‘माय मराठी कशी लिहावी कशी वाचावी’ हे पुस्तक संशोधनासाठी तसेच मराठी भाषेच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ‘भाषाव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते