तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेल्या विधानाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे का ? स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे ठाकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी. ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडावे, अन्यथा त्यांचा स्टॅलिन यांना पाठिंबा आहे, असे समजून आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांनी दिला.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणावरून बावनकुळेंची टीका, म्हणाले “ठाकरे सरकारने केलेले पाप..”
सनातनी हिंदूच्या धैर्याची परीक्षा कोणीही घेऊ नये. सनातन धर्माची तुलना ही डेंग्यू मलेरियाशी करण्याचा प्रयत्न स्टॅलिन यांनी केला. सुनियोजित पद्धतीने उदयनिधी मारन, स्टॅलिन, कार्ती चिंदबरम, मल्लिकार्जुन खरगे व त्यांचा मुलगा सनातन धर्मावर टीका करीत आहे. यापुढे विश्व हिंदू परिषद कायदेशीर आणि रस्त्यावर उतरून त्यांना चोख उत्तर देईल, असे शेंडे म्हणाले. सनातन धर्म संपवण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र ते कधीच यशश्वी होणारन नाही. डीमकेसोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही शेंडे म्हणाले.