नागपूर : श्रीरामजन्मभूमी लोकार्पण सोहळ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही वरिष्ठ नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्ये ही निंदनीय आणि निषेधार्ह आहेत. त्यामुळे यापुढे रामजन्मभूमीबाबत लोकार्पण सोहळ्याबाबत वादग्रस्त विधाने केल्यास त्यांना विश्व हिंदू परिषद जशास तसे उत्तर देतील, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र प्रमुख गोविंद्र शेंडे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यातून अगदी स्पष्ट होत आहे की हा पक्ष श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रस्थापित केलेल्या आपल्या मूळ हिंदुत्वाच्या विचारधारेपासून कोसो दूर गेला आहे. आज या गटाच्या प्रवक्त्यांनी रामजन्मभूमी लोकार्पण सोहळा हा दंगली घडविण्यासाठी व निवडणुकीत फायदा घेण्यासाठी भाजपने आयोजित केलेला सोहळा आहे, असे वक्तव्य करून श्रीरामजन्मभूमीवर श्रद्धा असणाऱ्या देशातील सर्व साधू संत, श्रीरामभक्त सकल हिंदू समाज व या आंदोलनासाठी असंख्य बलिदान देणाऱ्या विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्व हिंदुत्ववादी श्रीरामभक्त संघटनांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. विश्व हिंदू परिषद याचा तिव्र निषेध करुन राज्य शासनाने यावर उचित कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिण्यात आले आहे.

Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
PM Narendra Modi
PM Narendra Modi : जखमी खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विचारपूस, नेमकं काय घडलं संसदेत?
aaditya thackeray
Aaditya Thackeray : “काँग्रेस असो वा भाजपा…”, मुंबईच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा थेट काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना इशारा; म्हणाले…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : भाजपा खासदाराचा राहुल गांधींवर धक्काबुक्की करुन पाडल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाले, “मला संसदेत…”
Ramdas Athawale
Ramdas Athawale : अमित शाह यांच्या ‘त्या’ विधानावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेस जाणूनबुजून…”
Uddhav Thackeray Slams BJP And Amit Shah
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आक्रमक, “अमित शाह यांचा बाबासाहेब आंबेडकरांविषयी उद्दाम उल्लेख, हा उर्मटपणा…”
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis Rahul Narwekar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीस, राहुल नार्वेकरांची भेट; सुनील प्रभूंनी सांगितलं नेमकी चर्चा काय झाली?

हेही वाचा… चंद्रपुरात वाघाला पळविण्यासाठी मुखवट्याचा प्रयोग

हेही वाचा… रस्त्यावर बांगड्या विकणारा तरुण बनला आयएएस अधिकारी! दोन वेळच्या जेवणाची होती भ्रांत, रमेश घोलप यांची प्रेरणादायी कहाणी

उद्धव ठाकरे यांनी मतांच्या जोगव्यासाठी मुस्लीम तुष्टीकरणात आता सर्वांना मागे टाकले आहे असे या प्रकारातून स्पष्ट होते. श्रीरामजन्मभूमी सोहळ्याला कलंक अथवा गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास विश्व हिंदू परिषद श्रीरामभक्त हिंदूंच्या साहाय्याने तो प्रयत्न निष्प्रभ करेल असा इशारा शेंडे यांनी दिली.

Story img Loader