नागपूर: देशाची धोरणे ठरवणाऱ्या संसद आणि सरकारवर एकेकाळी दलालांचे वर्चस्व होते. ज्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने या दलालांना हटवून भ्रष्टाचार संपवला. त्यामुळे आता भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नागपुरातील रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी आयोजित या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

हेही वाचा… “पंतप्रधान मोदींनी भारताची प्रतिष्ठा वाढवली, 

यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, सामान्य माणूस हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मात्र, भ्रष्टाचारामुळे त्याच्यावर अन्याय होत होता. आता भ्रष्टाचार शून्यावर आला आहे. म्हणून सर्व भ्रष्टाचारी एकत्र येऊन बचावाचा मार्ग शोधत आहेत. यासाठी आंदोलकाच्या भूमिकेत जात आहेत.

मतभेदाला विरोध मानू नका

भारताला जगात लोकशाहीची जननी म्हटले जाते. सर्व वर्ग आणि विचारसरणीचे लोक मुख्य प्रवाहात सहभागी आहेत हे आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. पण आज आपली मुख्य समस्या ही आहे की आपण विरोधी विचारसरणीबद्दल खूप असहिष्णू झालो आहोत. विरोधी विचार मोकळ्या मनाने ऐकले पाहिजेत. मतभेदाला विरोध मानू नका, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.