नागपूर : रामदेवबाबा विद्यापीठाच्या ‘डिजीटल टाॅवर’ नावाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संस्थेचे संस्थापक व माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपराष्ट्रपतींनी तरुणांना सांगितले की, भारतासाठी एक काळ असा होता की, समाजाच्या आतपर्यंत भ्रष्टाचार शिरला होता. भ्रष्टाचारामुळे कुणालाही नोकरी, कंत्राट, चांगली संधीही मिळत नव्हती. मात्र, आता तो काळ राहिलेला नाही. आपण आज भ्रष्टाचारमुक्त भारतात असून दलालांची जात संपूर्ण नष्ट झाली आहे. ती पुन्हा कधीही डोके वर काढू शकणार नाही. यामुळे युवकांना आजच्या काळात चांगल्या संधी आहेत, असे सांगितले.

Dr. Nitin Raut, Dr. Milind Mane
उत्तर नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राऊत- माने लढत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
dhananjay y chandrachud
राज्यपालांनी विधेयके प्रलंबित ठेवणे अयोग्य, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे मत; ‘संघ राज्यपद्धती बळकट होण्यासाठी न्यायालयांचे मोठे योगदान’
hajari karyakarta marathi news
‘हजारी कार्यकर्ता’ यंत्रणा मोडीत?
Rashtriya Swayamsevak Sangh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; शतकानंतरची वाटचाल!
Avoid paying salary to ST employees before Diwali citing code of conduct
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत नवीन घडामोड, दिवाळीपूर्वी…
sky lanterns, heavy rainfall, lanterns, lanterns news,
कंदिलांना काजळी, आकाश कंदिलांकडे नागरिकांची पाठ, बेभरवशी पावसामुळे नुकसान

हे ही वाचा…बुलढाणा : संकलन साहित्य संपले, पण रक्तदात्यांची रांग कायम!

मोदी सरकारच्या कार्यकाळाचे गुणगाण

उपराष्ट्रपती धनखड पुढे म्हणाले, की आज जागतिक लोकशाही दिवस असून गुणवत्तापूर्ण शिक्षण हे चांगल्या लोकशाहीसाठी फायदेशीर आहे. विकसित भारतासाठी ते मदत करेल. आधी जगामध्ये भारताची ओळख ही झोपलेल्या लोकांचा देश अशी होती. आता भारत जागृत झाला आहे. विकासाच्या दिशेने नवनवीन क्षितिज गाठत असून भारताला विकसित होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. गुंतवणूक व चांगल्या संधींसाठी सर्वांचा भारत हा आवडता देश झाला आहे. आम्ही कधीही कुठल्या देशावर आक्रमण केले नाही. परंतु, कुठल्या देशावर आक्रमण झाल्यास भारताने त्यात मध्यस्थी करावी अशी ताकद आमच्या देशामध्ये आता आली आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाची माहिती दिली.

हे ही वाचा…बुलढाणा : तब्बल दहा तास टॉवरवर चढून आंदोलन; उडी घेण्याचा…

सरकारी नोकऱ्यांपेक्षा येथे संधी

आज भारताचा जगामध्ये डंका वाजत आहे. तरुणांसमोर अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु, आम्ही केवळ सरकारी नोकरीकडेच संधी म्हणून बघतो आणि अनेक गोष्टी गमावून बसतो. तंत्रज्ञान, अंतराळ, समुद्र या क्षेत्रातही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करा, असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले.

हे ही वाचा…‘हे गणराया..’ यांना सदबुद्धी दे .. ,नागपुरात या फलकाची चर्चा

‘इस्त्रोमध्ये आयआयटी, एनआयटीमधील कुणीही नाही’

भारतीय अंतराळ संस्था ‘इस्त्रो’मध्ये आयआयटी, एनआयटीमधील कुणीही नाहीत. तेथे काम करणारे सर्व लोक हे सामान्य महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हालाही अशा संधी आहेत. १९६० मध्ये आम्ही सायकलवरून रॉकेट नेऊन दुसऱ्या देशातून त्याचे प्रक्षेपण करत होतो. मात्र, आता पैशांचा योग्य उपयोग होत असल्याने अमेरिका आणि अन्य देशांच्या रॉकेटचे आम्ही प्रक्षेपण करतो, असे उपराष्ट्रपती म्हणाले.