धुनिवाले मठाजवळील जिजामता स्मारकाला हार्रापण करून म. गांधी, डॉ. आंबेडकर, झाशी राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घालून विचार यात्रा सुरू करण्यात आली. धुळे, नंदुरबार, मेळघाट आदी जिल्ह्यांतील आदिवासी लोकांनी डोळे फिटणारे नृत्य विचार यात्रेत सादर केले.
विविध महाविद्यालयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सहभाग नोंदविला. विचार यात्रा पुढे सोशालिस्ट चौक, इंदिरा मार्केट रोड, राजकला टाॅकिज चौक, एमगिरी रोड रामनगर मार्गे शहिद भगतसिंग पुतळ्याला हार घालून अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन स्थळी पोहोचली.
हेही वाचा – कविता प्रकटल्या दृश्यरुपात, बालचित्रकारांनी साकारली वैदर्भीय काव्य नक्षत्रमाला
हेही वाचा – चंद्रपूर : विदेशात पायलट असल्याचे सांगून तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अन्…
जिल्हाधिकारी कर्डिले, विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे, संघटक किशोर ढमाले, विद्रोही साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रतिमा परदेशी, प्रा.नितेश तराळे, गजेंद्र सुरकार, महादेवराव भुईभार, प्राचार्य सवाई, प्राचार्य डॉ. चंदू पोपटकर, डॉ. बाबा शंभरकर, राजेंद्र कळसाईत, गुणवंत डकरे, प्राचार्य जनार्दन देवतळे, शंभरकर, डॉ.चेतना सवाई, डॉ. माधुरी झाडे, नंदकुमार वानखेडे उपस्थित होते.