बुलढाणा : जिल्ह्यातील चिखली व देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधकांना या ठिकाणी काही संधीच नसल्याने दोन्ही ठिकाणी आघाडीचे उमेदवार अविरोध निवडून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिखलीत आमदार राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखा खेडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १८ पैकी १७ जागा जिंकत भाजपा-शिंदे गटाला धोबी पछाड दिली होती. आज गुरुवारी आयोजित निवडणुकीत सभापतिपदी काँग्रेसचे डॉ. संतोष वानखेडे तर उप सभापती पदी राष्ट्रवादीचे राम खेडेकर यांची अविरोध निवड झाली.

हेही वाचा… ४१ कोटींच्या स्थानकावर २४ कोटींचे पार्किंग, नागपूर मेट्रोचा अफाट खर्च

हेही वाचा… धक्कादायक! आठवीची विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती, सातवीच्या विद्यार्थ्यावर बलात्काराचा गुन्हा

देऊळगाव राजामध्ये देखील आघाडीने अविरोध बाजी मारली. तिथे सभापती पदी राष्ट्रवादीचे समाधान शिंगणे तर उप सभापतीपदी ठाकरे गटाचे दादाराव खार्डे यांची वर्णी लागली. निकालानंतर दोन्ही ठिकाणी आघाडीच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory in chikhali deulgaon raja apmc market election by maha vikas aghadi in buldhana district scm 61 asj