अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी ‘हम सब एक साथ’चा संदेश दिला आहे. मूर्तिजापूरमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचा सहभाग असलेल्या सहकार पॅनलने बाजी मारली, तर बाळापूरमध्ये महाविकास आघाडी, भाजपा, शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे.

अकोला जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात बाळापूर, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूरमध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे सुहास तिडके यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सहकार पॅनल आणि दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिडके हे सहभागी असलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलमध्ये लढत झाली.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार

हेही वाचा – नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले; तरुणी गर्भवती होताच…

सहकार पॅनलने बाजी मारली. गेल्या ३० वर्षांपासून या बाजार समितीवर सहकार पॅनेलची सत्ता आहे. या निवडणुकीसाठी काका-पुतणे आमने-सामने उभे ठाकले होते. शेतकरी सहकार पॅनलला १६, तर परिवर्तन पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. मूर्तिजापूर बाजार समितीच्या निवडणुकीत प्रशांत कांबे, सुहास तिडके, अमित कावरे, दिवाकर गावंडे, साहेबराव ढाकरे, आनंद पाचडे, अरूण सरोदे, गणेश महल्ले, विष्णू चुडे, शोभा तिडके, चित्रा सरोदे, नारायण भटकर, मोहन गावंडे, दादाराव किर्दक, अक्षय राऊत, अ. मुजहिद अ. कय्युम हे विजयी झाले. किर्तीकुमार भारूका व शामसुंदर अग्रवाल हे बिनविरोध निवडून आले आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर : बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेसमधील मतभेद उघड

बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व कायम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. पुन्हा एकदा बहुमत मिळाले. या ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही गट, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीचा शेतकरी सहकार पॅनलमध्ये समावेश होता.