नागपूर: कोकणसह आता विदर्भालाही पावसाचा “येल्लो अलर्ट” देण्यात आला आहे. यादरम्यान, मुसळधार पावसासह काही भागांत विजांचा कडकडाट होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात येत असला तरी कोकण वगळता राज्यात इतरत्र पावसाचा जोर नाही. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागांत मुसळधार, तर काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
हेही वाचा… “मी पंतप्रधान झालो तर काय फरक पडणार?”, उद्धव ठाकरेंचा प्रश्न; म्हणाले, “आणीबाणीपेक्षाही …”
कोकण भागात १० ते १३ जुलै रोजी मुसळधार पाऊस व किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातही ‘यलो अलर्ट’ असून, काही भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात अनेक भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे.