नागपूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या महिला एकदिवसीय सामन्यात विदर्भाचा संपूर्ण संघ केवळ २८ धावांवर बाद झाला. दिल्लीच्या संघाने केवळ १० षटकात लक्ष्य प्राप्त करत विदर्भाचा दारुण पराभव केला.
दिल्ली संघाने नाणेफेक जिंकत विदर्भाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र विदर्भाचे फलंदाज मैदानावर जास्त काळ घालवू शकले नाही. विदर्भाच्यावतीने केवळ कांचन नागवानी दुहेरी अंकात प्रवेश करत १२ धावा काढल्या. विदर्भाचे चार फलंदाज शून्य धावांवर बाद झाले तर पाच फलंदाजांनी प्रत्येकी केवळ एक धावाची मजल मारली. वैष्णवी खांडेकर यांनी २ धावा काढल्या. विदर्भाचा संपूर्ण संघ २२.३ षटकात केवळ २८ धावा काढू शकला.
हेही वाचा – हंगाम संपल्यावर संत्री निर्यात अनुदान योजना लागू; शेतकऱ्यांमध्ये रोष
दिल्लीच्या संघाने दोन गडी गमावत केवळ १० षटकात लक्ष्याची प्राप्ती केली. दिल्ली संघाकडून सर्वाधिक चार गडी प्रिया मिश्रा यांनी बाद केले. मधू यांनी विदर्भाच्या तीन फलंदाजांना माघारी पाठविले. पेरुणिका सिसोदिया यांनी दोन तर सोनी यादव यांनी एक गडी बाद केला. विदर्भाचे पहिले सहा गडी दहा धावा पूर्ण होण्यापूर्वी बाद झाले होते. यानंतर कांचन नागवानी आणि एन.टी. कोहळे यांच्यामध्ये झालेल्या १२ धावांच्या पार्टनरशिपमुळे विदर्भाला किमान २८ धावांपर्यंत मजल मारता आली.