चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी लॉकर तोडून रोख रक्कम व सोन्यासह एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. दरोडेखोरांनी मागील खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्यानंतर लॉकर रूममधील तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून आठ लाख ४० हजार रोख आणि १३ लाख रुपयांचे सोने चोरून नेले. विशेष म्हणजे, आठ महिन्यांपूर्वी याच बँकेचा अस्थायी कर्मचारी नंदकिशोर हनवते याने खातेदाराची फसगत करून ५७ लाखाची अफरातफर केली होती. या प्रकरणी तो सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोडा ; सोन्यासह एकवीस लाखांचा मुद्देमाल पळविला
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी लॉकर तोडून रोख रक्कम व सोन्यासह एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-10-2022 at 10:46 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha konkan gramin bank stole gold worth twenty one lakhs amy