नागपूर: विदर्भातील लोकसभेच्या दहा जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यातील एकूण ६० पैकी ४२ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे असून उर्वरित १७ ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. एका ठिकाणी अपक्ष आघाडीवर आहे. सहा महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता मतदारांचा हा कल राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरतो.

विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. यापैकी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हा उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघाला तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ हिंगोलीला जोडण्यात आला आहे. उर्वरित ६० जागांचा समावेश विदर्भातील दहा लोकसभा मतदारसंघात होतो. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विधानसभानिहाय कल लक्षात घेता ४२ मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरतो. तर १७ विधानसभा मतदारसंघात महायुतीला व एका ठिकाणी अपक्षाला दिलासा देणारा ठरतो. महायुतीला मिळालेल्या तीन लोकसभेच्या जागांपैकी भाजपला अकोला व नागपूर या दोन ठिकाणी विजय मिळाला. शिंदे गटाने बुलढाण्याची जागा जिंकली.

Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

हेही वाचा – फडणवीस यांची नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे शिरीष धोत्रे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अजय पाटील यांचा पराभव केला. भाजपला अकोट (९१६८ चे मताधिक्य), अकोला पूर्व ( आघाडी ८७८११), मूर्तिजापूर (आघाडी ८१४७) आणि रिसोड (आघाडी ८०८२) या चार विधानसभा मतदारसंघात तर काँग्रेसला बाळापूरमध्ये (आघाडी९८४४ ), अकोला पश्चिम (आघाडी १२०७१) मध्ये आघाडी मिळाली.

नागपूर लोकसभा मतदारसंघांत भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले. त्यांनी शहरातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. एका ठिकाणी काँग्रेसचे विकास ठाकरे आघाडीवर आहे. दक्षिण-पश्चिम (आघाडी ३३,५३५), दक्षिण नागपूर ( आघाडी २९,७१२) , पूर्व (७३,३७१), मध्यनागपूर (२५,८६१), पश्चिम नागपूर (६,६०४ ) या मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. यात पश्चिम नागपूर हा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. उत्तर नागपूरमध्ये (३२,२१५) काँग्रेसने आघाडी घेतली.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाथव विजयी झाले. त्यांना जिल्ह्यातील मेहकर (२७३), खामगाव (२०,२८६), जळगाव जामोद (१३,९९२) या तीन विधानसभा मतदारसंघात तर पराभूत उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे नरेंदर खेडेकर यांना बुलढाणा (२२५५) व चिखली (१९९२०) या दोन मतदारसंघात मताधिक्य मिळाले. सिंदखेड मतदारसंघात अपक्ष रविकांत तुपकर यांना मताधिक्य मिळाले.

महायुतीची घोडदौड

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात वर्धा लोकसभा मतदारसंघात विजय मिळाला. या पक्षाचे अमर काळे यांनी भाजपचे रामदास तडस यांना पराभूत केले. या मतदारसंघातील सहापैकी धामनगाव (१२,५९८), हिंगणघाट (१६,४४७), देवळी (३५,१४७), आर्वी (१८४४४) या चार मतदारसंघात आघाडी मिळाली तर पराभूत उमेदवार भाजपचे रामदास तडस यांना मोर्शी (१४,९८०) विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. काँग्रेसला गडचिरोली, भंडारा-गोंदिया, अमरावती, रामटेक आणि चंद्रपूर या पाच जागा मिळाल्या. गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान विजयी झाले. त्यांनी सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. त्यात आमगाव (आघाडी १०,८६९), आरमोरी (आघाडी ३३,४२१) गडचिरोली (आघाडी २२९१७) अहेरी आघाडी (१२,१५२) ब्रह्मपुरी- (आघाडी २३,५१४), चिमूर- (आघाडी ३७,३६१) आदी मतदारसंघाचा समावेश आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला. या निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील सहापैकी अमरावती (आघाडी ४१, ६४८ ) , तिवसा – (आघाडी १०, ५७६), दर्यापूर (आघाडी- ८, ६७१ ) अचलपूर (आघाडी- ६, ७९३ ) या चार मतदारसंघात आघाडी घेतली तर भाजपच्या नवनीत राणा यांनी बडनेरा (२६, ७६३ ), मेळघाट -( २१, ५९५ )या दोन विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली.

हेही वाचा – नागपूर लोकसभा निवडणूकीत बसपच्या मतांमध्ये घट, सलग चौथ्या निवडणूकीत…

रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाले. त्यांनी मतदारसंघातील सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. काटोल विधानसभा मतदारसंघात (५१०८), सावनेर ( १६,६०९), हिंगणा ( १७,८६२), उमरेड (१४,८७९), कामठी (१७,५३४), रामटेक (४६६८) आदी मतदारसंघात आघाडी घेतली. भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजयी झाले. त्यांना मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा आघाडी मिळाली. त्यात भंडारा-पवनी (आघाडी ९ हजार), साकोली – लाखनी- लाखांदूर विधानसभा (आघाडी २७ हजार ३००) तुमसर-मोहाडी विधानसभा (आघाडी २३ हजारांची), अर्जुनी/मोरगाव -(२०हजार ८०० ) या मतदारसंघाचा समावेश आहे तर भाजपचे पराभूत उमेदवार सुनील मेंढे यांना गोंदिया-( ३५ हजार ), तिरोडा (आघाडी ९ हजार ) या दोन विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली.

चंद्रपुरात विक्रमी मताधिक्य

लोकसभेच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात २ लाख ६० हजाराच्या विक्रमी मताधिक्याने जिंकणाऱ्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना सहाही विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळाले आहे. या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सर्वच ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे.

विधानसभेचे संख्याबळ

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ जागांपैकी भाजपला २३, काँग्रेसला १५, राष्ट्रवादीला ६, शिवसेनेला ४ व अपक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या.

Story img Loader