दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबला आहे, असे वाटत असतानाच आणि दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणाने दर्शन दिल्यानंतर पुन्हा पावसाच्या हलक्या सरी कोसळायला लागल्या आणि नागपुरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. यामुळे गोसीखुर्द धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले
मागील तीन दिवसांपासून विदर्भात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील धरणाचे काही दरवाजे आज उघडण्यात येणार आहेत तर गोसीखुर्दचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. तिथून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यातही थांबलेल्या पावसाला सुरुवात झाली आहे.