विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२३ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्षाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

विदर्भ साहित्य संघाकडे २०२१-२२ या काळात प्रकाशित झालेल्या साहित्यकृती प्रवेशिकांमधून विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना पुरस्कृत करण्यात आले आहे. या वर्षीपासून विदर्भाबाहेरील लेखकांच्या पुस्तकांना सुद्धा राज्य पातळीवरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षी पु.ल. देशपांडे स्मृती कादंबरी लेखन पुरस्कार देवेंद्र पुनसे यांच्या ‘इथे जिंकला बाजार’, वा. कृ. चोरघडे स्मृती कथालेखन पुरस्कार विशाल मोहोड यांच्या ‘कुचंबणा’ कादंबरीला, य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार ‘लीळाचरित्रातील कथनरूपे’ (डॉ. राजेंद्र रंगराव राऊत), कुसुमानील स्मृती समीक्षा लेखन पुरस्कार ‘काव्यप्रदेशातील स्त्री’ (किरण शिवहरी डोंगरदिवे), शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती कवितालेखन पुरस्कार ‘असहमतीचे रंग’(अशोक पळवेकर), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती चरित्र/आत्मचरित्र लेखन पुरस्कार ‘निळाईच्या छटा’ (एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर), वा. ना. देशपांडे स्मृती ललित लेखन पुरस्कार ‘गारवा आणि झळा’ (वर्षा ढोके), मा. गो. देशमुख स्मृती संत साहित्य लेखन पुरस्कार ‘पायरीचा चिरा’ (डॉ. माधवी जुमडे). या पुस्तकांसोबतच नवोदित लेखकांना देण्यात येणारे पुरस्कार यावर्षी नितीन करमरकर यांच्या ‘समर्पण’ या कथासंग्रहाला आणि मेघराज मेश्राम यांच्या ‘माणूस असण्याच्या नोंदी’ या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आले.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
How is census of population conducted
जनगणना कशी होते? प्रगणकांना कोणते अनुभव येतात?
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

हेही वाचा: “काही लोकांना वाटलं पटापट विकेट पडतील पण मला…”; बंडखोरीची आठवण काढत CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये पु. भा. भावे स्मृती पुरस्कार महेश खरात यांच्या ‘बुर्गांट (कादंबरी), श्रीधर शनवारे स्मृती पुरस्कार पी. विठ्ठल यांच्या ‘मी सार्वकालिक सर्वत्र’ (कवितासंग्रह) आणि डॉ. आशा सावदेकर स्मृती पुरस्कार डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘वाचनसंस्कृती, लेखनसंस्कृती’ (संकीर्णलेखन) या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त काही पुस्तकांना विशेष पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्यात ‘गावकारागिरांचे शब्द-जीवनचित्र’ (सीमा रोठे शेट्ये), बांगला मराठी शब्दकोश (संपादक : मंदिरा गांगुली, मीनल जोशी, प्रमोदिनी तापास आणि डॉ वीणा गानू), राजन लाखे संपादित ‘बकुळगंध’ आणि प्रशांत पनवेलकर यांच्या ‘नवा पेटता काकडा’या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: ‘नासुप्र’च्या भूखंड वाटप प्रकरणात कोण कुठे चुकले?; अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून कर्तेधर्ते मोकळे

यावर्षीचा ‘युगवाणी’ उत्कृष्ट लेखासाठी देण्यात येणारा कविवर्य ग्रेस स्मृती पुरस्कार डॉ. नितीन रिंढे यांच्या ‘युगवाणी’तील परकाया प्रवेश या लेखासाठी जाहीर झाला असून शांताराम कथा पुरस्कार प्रणव सखदेव यांच्या ‘हंस’ या दिवाळी अंकातील ‘पतंग’ या कथेसाठी जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी विदर्भ साहित्य संघाच्या एका शाखेला उत्कृष्ट शाखा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार चंद्रपूर शाखेला प्रदान करण्यात आला आहे. तसेच हरिकिशन अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार पत्रकार प्रवीण खापरे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार समारंभाला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले