नागपूर : १ जुलै २०२३ रोजी नागपूरवरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा, तहसील सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा येथे २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली.
हेही वाचा – नागपूर : अपघातग्रस्त बसचे बुकिंग कार्यालय बंद, नातेवाईकांचा संताप
या बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (०७१२-२५६२६६८) अथवा अंकुश गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (८८६००१८८१७) यांच्यांशी संपर्क साधावा, असे अहवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.