परनॉर्ड रिकॉर्ड इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रसन्ना मोहिले यांची लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भाचा औद्योगिक विकास हवा तसा झाला नाही  आणि त्यामुळेच आपण स्थानिक युवकांना रोजगार देण्यास अपयशी ठरलो. नेमके हेच चित्र बदलायची गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. या क्रमात येत्या २ नोव्हेंबरला इन्डो -फ्रेन्च चेम्बर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून फ्रान्सच्या ६० मोठय़ा कॉर्पोरेट कंपन्यांना नागपुरात आमंत्रित केले आहे. उद्योग आणि रोजगार उभारून विदर्भाचा औद्योगिक विकास घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती परनॉर्ड रिकॉर्ड इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रसन्ना मोहिले यांनी दिली. आज शुक्रवारी लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते.

मोहिले पुढे म्हणाले, अति दुर्गम भागातील गावाला डिजिटलाईट करायचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्वप्न  आहे. त्यामध्ये मुलांचे शिक्षण, महिला सशक्तीकरण आदी विषय आहेत. त्यावर आम्ही गेल्या दीड वर्षांपासून काम केले आणि एका संस्थेच्या माध्यमातून त्याला सामाजिक उत्तर दायित्व निधी (सीएसआर) मिळवून देत पहिल्या ऑफलाईन शाळेच्या प्रकल्पाला सुरुवात केली. त्यासाठी जवळपास पाच कोटींचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये गडचिरोली, मेळघाट भागात पाचशे शिक्षकांना प्रशिक्षण दिले आणि टॅबद्वारे अभ्यासक्रमही शिकवला.तसेच शाळेत प्रोजेक्टर, स्क्रीन, स्पीकर्स देण्यात आले. गावात विजेची उपलब्धता नसल्याने तेथे बॅटरीदेखील दिल्यात. त्यामुळे अनेक भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. तसेच नागपूरशी नाळ जुळली असल्याने मी गेल्या एक वर्षांत सीएसआरच्या माध्यमातून नागपूर जिल्’ात दहा कोटी रुपयांचे कामे केले आहे. गावखेडय़ात अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार बघता आम्ही  सुराबर्डी, कामठी आदी ठिकाणी शुद्ध पाण्याचे ५०वॉटर एटीएम बसवले. १५ लाख रुपये प्रति एटीएम खर्च आला. यातून पंचवीस पसे प्रति लिटर तर पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळत आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव तर कुठे निधीची कमतरता दिसून आली. त्यामुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी काही करावे, याकडे मी लक्ष केंद्रित केले आणि शहरातील २५ मनपा शाळांमध्ये २५  डिजिटल क्लासरुम तयार करून दिल्या. राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाचा मी संस्थापक अध्यक्ष असून त्या माध्यमातून आम्ही नागपूर पोलिसांना १,७०० रेनकोट दिले आहेत. अमरावती जिल्’ातील प्रश्नचिन्ह शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही शौचालय बांधले , वर्षभरासाठी अन्न धान्याची व्यवस्था केली. आता तेथील महिलांना शिलाई मशीन देऊन कापडी पिशव्या तयार करण्याचा व्यवसाय देण्याचा विचार करतो आहोत.

जागतिक पर्यावरणाच्या दिवशी शंकरपूर येथे एक हजार झाडे लावली. मी गेल्या ३२ वर्षांपासून कॉर्पोरेट क्षेत्रात काम करीत आहे. माझ्या परनॉर्ड रिकार्ड इंडिया चॅरिटेबल फाऊंडेशन कंपनीच्या माध्यमातून आणि इतर कंपन्यांच्या सहकार्याने सीएसआरचा निधी गोळा करून सामाजिक कार्य सुरू आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात असलेले माझे संबंध बघता अनेक कंपन्या या विधायक कार्यात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य करताहेत. अनेक कंपन्यांना सीएसआर निधी खर्च करण्याची इच्छा असते. मात्र, निधीचा दुरुपयोग होऊ नाही, अशी भीती त्यांना असते. आम्ही निधी मिळाल्यावर खासगी संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण करतो आणि तो निधी योग्य खर्च झाला की नाही, याची तपासणी करतो. तो अहवाल निधी देणाऱ्या कंपन्यांना देखील देतो. एकंदरीत सीएसआरचा निधी खर्च करताना आम्ही पारदर्शकतेवर अधिक भर देतो.

राज्यात कूल टिन्स प्रकल्प  राबवणार

अनेक विद्यार्थी व्यसनाकडे वळताहेत. अगदी चौदा,पंधरा वर्षांचे विद्यार्थी दारू, सिगारेटच्या जाळ्यात अडकले आहेत.  त्यांना यापासून दूर ठेवण्यासाठी आम्ही राज्यातील सरकारी शाळेत कूल टिन्स प्रकल्प राबवणार आहोत. यामध्ये नाटकाच्या माध्यमातून जनजागृती, व्यसनाचे दुष्टपरिणाम, नराश्य, यापासून होणारे आजार याबद्दल माहिती देऊ. यासाठी सरकारकडून कोणताही निधी आम्ही मागत नाही. केवळ परवानगी मागितली आहे. टप्प्याटप्याने हा उपक्रम आम्ही राज्यात राबवणार आहोत.

नागपुरात उद्योगांचा अभाव

विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने उद्योग येणे महत्त्वाचे आहे. नागपुरात उद्योगांचा अभाव असल्याने तरुण नोकरीसाठी आपले घर सोडून इतर शहरात जात आहेत . ट्रिपल आयआयटी, नॅशनल लॉ स्कूल, एम्स किंवा आयआयएम  या संस्थेत शिकल्यावर तरुणांना त्या दर्जाचा रोजगारही शहरातच मिळायला हवा. मात्र, त्यासाठी नवे मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. त्यासाठी मी दोन नोव्हेंबरला नागपुरात फ्रान्सच्या ६० मोठय़ा कंपन्यांच्या मालकांना आमंत्रित केले असून त्यामाध्यमातून विदर्भात उद्योग थाटण्यास त्यांना आवाहन करणार आहे. सरकारकडेही उद्योगाला लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेची मागणी करणार आहोत, याकडेही  मोहिले यांनी लक्ष वेधले.