नागपूर : जंगलात मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांमध्ये कायम लपंडाव सुरू असतो. वाघ त्याला सावज दिसले की त्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसतो. तर सावजाला शिकाऱ्याची म्हणजेच वाघाची चाहूल लागली की तो आपल्या सुरक्षा कवचात शिरायचा प्रयत्न करतो. पण कित्येकदा का या लपंडावात वाघाचीच सरशी होते. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असाच एक थरारक प्रसंग अनुभवायला मिळाला. “डेक्कन ड्रीफ्टस”चे वन्यजीवप्रेमी कांचन पेटकर व पीयुष आकरे यांनी हा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके झाले काय ?

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील निमढेला नवेगाव क्षेत्रात अवघ्या १७ महिन्यांच्या वाघिणीने सांबरची शिकार सहजतेने केली. “झरणी” ही वाघीण आणि “छोटा मटका” या वाघाचे हे अपत्य.

हेही वाचा – वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन

शिकार केली, पण..

शिकारीनंतर ती आपल्या आईला म्हणजेच झरणी या वाघिणीला घेऊन आली. पण, घडले काही वेगळेच. त्या शिकारीपर्यंत पोहोचेस्तोवर याच परिसरातील “कलवा” हा वाघ तेथे आला. आणि त्याने पूर्ण शिकार फस्त केली.

दोघीही मायलेकी स्तब्ध, करण..

“झरनी” वाघिणीच्या मुलीने केलेल्या सांबरच्या शिकारीवर “कलवा” टायगर ने चक्क डल्ला मारत दुसऱ्या वाघिणीची शिकार फस्त केली.. हा सर्व प्रकार ताडोबाच्या निमडेला नवेगाव झोनमध्ये सफारी दरम्यान प्रेक्षकांनी अनुभवला.

शिकारीत नेमके काय होते?

ही संपूर्ण घटना बघता जंगलाच्या राजासह सर्व वन्यप्राण्यांना जंगलात आपले जीवन जगताना प्रत्येक दिवस प्रत्येक क्षणाला मोठी मेहनत व किती संघर्ष करावा लागतो, याचे हे उदाहरण आहे. वाघ शिकार केल्यानंतर ती मोठी असेल तर एक शिकार किमान तीन दिवस पुरवतो. त्यासाठी इतरांनी ती शिकार पळवून नेऊ नये म्हणून तो शिकार लपवून ठेवतो.

हेही वाचा – वाघाची शिकार : तब्बल ११ वर्षांनंतर शिकाऱ्याला शिक्षा…!

याआधी कमी वयात कोणी केली शिकार?

“झरणी” वाघीण आणि “छोटा मटका” वाघाच्या अपत्याने आज शिकार केली, पण शिकार तिला लपवता आली नाही. त्यामुळे इतर वाघाने तिची शिकार फस्त केली. यापूर्वी नागझिरा अभयारण्यात “जय” या जगप्रसिद्ध वाघाने अवघा दीड वर्षांचा असताना महाकाय अशा रानगव्याची शिकार तर केली, पण ती फस्त देखील केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video just a few months old tigress did hunting incidents in the tandoba andhari tiger project rgc 76 ssb