डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहात एक विद्यार्थी वेषांतर करून शिरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अभाविपने आंदोलन करून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना निवेदन दिले. याप्रकरणी आज चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात एक विद्यार्थी शिरल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. सुमारे आठ दिवस आधीचा हा प्रकार असल्याची माहिती आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेत निष्काळजी करण्यात आली व या माध्यमातून सुरक्षेसंदर्भात अनेक प्रश्न ऐरणीवर आले.

भंडारा : मोबाईलवर बदनामीकारक बोलल्याच्या कारणावरून विद्यार्थिनीला मारहाण

संबंधित प्रकार हा गंभीर असून तो लक्षात आणून देण्यासाठी विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात आंदोलन केले. या प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच विद्यापीठाची सुरक्षा वाढवावी, भविष्यात असा निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video leak student entered in ladies hostel in dr panjabrao krushi vidyapith tmb 01