लोकसत्ता टीम

चंद्रपूर: प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून चित्रफीत समाज माध्यमावर सार्वत्रिक केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि. ३०) विठ्ठलवाड येथे शनिवारी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी शुभम देवीदास चुदरी (२०, रा. तारसा खुर्द) याला अटक केली आहे.

आणखी वाचा-गुन्हा दाखल होण्याच्या काही तासांआधी संस्थाचालक पोलीस ठाण्यात; विद्यार्थिनींचा आरोप

गोंडपिपरी तालुक्यातील तारसा खुर्द येथील आरोपी शुभम चुदरी याने विठ्ठलवाडा येथील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला व्हीडीओ कॉल करून व नग्न करून तिची चित्रफीत बनविली आणि समाज माध्यमावर सार्वत्रिक केली.ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवरून गोंडपिपरी पोलिसांनी आरोपी शुभम चुदरी याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पोस्कोअंतर्गत ३७६ / ६ गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहेत. तालुक्यात सायबर क्राईम वाढल्याने पोलिस आता अलर्ट झाले आहे.

Story img Loader