चंद्रपूर : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वाघांचे मनसोक्त दर्शन होत आहे. बबलीच्या पिल्लांनी पर्यटकांना दर्शन दिले असून मौजमस्ती करताना पिल्लांचा व्हिडीओ पर्यटकांनी टिपला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघांच्या तुम्ही नानाविध अदा बघितल्या असतील. अनेकांनी वाघांना खेळताना बघितलेले आहे. तर कुणी त्यांना मौजमस्ती करताना बघितले. काहींनी तर त्याही पलिकडे जाऊन वाघांची प्रणयक्रिडा बघितलेली आहे. दोन दिवसांपूर्वी वरोरा येथील पर्यटक डॉ. हेमंत खपणे मित्रांसोबत ताडोबात सफारीसाठी गेले होते. त्यांना बबली व तिच्या पिल्लांनी मनसोक्त दर्शन दिले. या वाघांच्या बछड्यांचे मौजमस्ती करीत असतानाचा व्हिडीओ चित्रित केला आहे. या व्हिडीओचं क्रेडीट वरोरा येथील डॉ. हेमंत खापणे यांनाच जाते. त्यांनी मोठ्या शिताफीने हे क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद केले आहेत.

हेही वाचा – वर्धा : भिडेंविरोधात गांधीवादी संतप्त, सुरू केले ‘प्रश्न विचारा’ आंदोलन

हेही वाचा – पावसाची विश्रांती! आता काही दिवस सूर्यनारायण डोकावणार

ताडोबामध्ये पावसाळ्यात वाघ बघायला मिळत नाही, हा अनुभव आहे. पण डॉ. हेमंत खापणे व अरुण उमरे या मित्रांना एकाचवेळी बबलीच्या तीन बछड्यांनी दर्शन दिले. या तिन्ही बछड्यांनी मित्रांना भुरळ पाडली. त्या बछड्यांनी आपल्या वेगवेगळ्या अदांचे प्रदर्शनच मित्रांसमोर मांडले. यावेळी पाच ते सहा मिनिटं ही बछडे मस्तपैकी आपापसात खेळली. बछड्यांच्या खेळण्याचे दृश्य अप्रतिमच होते. त्याचेही चित्रण डॉ. हेमंत खापणे यांनी केले.