नागपूर : खासदर औद्योगिक महोत्सवातील कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत संकुलातील स्वच्छतागृहात महिलांचे आक्षेपार्ह चलचित्र काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी एका कला शिक्षक असलेल्या आरोपीला अटक केली आहे.
मंगेश विनायक खापरे (३७) रा. तिनल चौक, इतमवारी असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा शहरातील एका खासगी शाळेत कला शिक्षक आहे. त्यामुळे महोत्सवाच्या आयोजकांनी मुख्य द्वार सजवण्यासाठी आरोपीला बोलावले होते. परंतु, त्याने तेथे हे गैरकृत्य केले.
हेही वाचा – गृहमंत्री फडणवीस यांच्या जिल्ह्यात एटीएम फोडून १० लाख रुपये पळवले
हेही वाचा – मद्य शौकिनांच्या खिशावर भार वाढणार, काय आहे कारण?
रातुम विद्यापीठाच्या प्रांगणात २७ ते २९ जानेवारीदरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी देश-विदेशातून उद्योजक नागपुरात आले होते. महोत्सवादरम्यान प्रशासकीय संकुल इमारतीतील महिलांच्या स्वच्छतागृहातच आरोपी महिलांचे अश्लील चलचित्र बनवत होता. हा प्रकार एका महिलेला दिसला. ती महोत्सवात स्वयंसेविका होती. तिने ही माहिती महोत्सवाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता मंगेश बाथरूमजवळून पळताना दिसला. त्यानंतर उपस्थितांनी त्याला चांगलाच चोप दिला. पोलिसांनाही माहिती दिली. पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.