ढोल ताशाचा निनादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपूरमध्ये नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रा्ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. मात्र एका क्षणी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंना दंडाजवळ पकडून खेचल्याचा प्रकारही कॅमेरासमोरचं घडला.
झालं असं की पंतप्रधान मोदींनी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये नामशिलेचं अनावरण केलं. यावेळी तेथे राज्यपाल भगतिसंह कौश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेही उपस्थित होते. उद्घाटनानंतर नामशिलेसमोर सर्व मान्यवरांचा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स पुढे आले. त्यावेळी पंतप्रधान मोदींपासून काही अंतर ठेऊन मुख्यमंत्री शिंदे उभे होते. शिंदेंच्या बाजूला फडणवीस आणि दानवे उभे होते.
फोटोग्राफर्सने फोटोसाठी सर्व नेत्यांना जवळजवळ उभं राहण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही शिंदे थोडेसे अवघडल्यासारखेच मोदींच्या बाजूला सरकले. मात्र शिंदेंना अवघडल्यासारखं होत असल्याचं लक्षात आल्यानंतर मोदींनीच हसत हसत त्यांच्या दंडाजवळ हात पकडून त्यांना आपल्या बाजूला खेचलं आणि पाठीवश कौतुकाची थाप मारली. मोदींची ही कृती पाहून शिंदेंनी हात जोडले. त्यावेळी मोदींनी त्यांना काहीतरी विचारलं ज्यावर शिंदेंनी मान हलवून होकार दिला. नंतर मोदींनी शिंदेंचे जोडलेले हात पकडून खाली घेतले. मोदी आणि शिंदेंनी हात पकडूनच फोटो काढला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या व्हिडीओत हा सारा प्रकार घडल्याचं दिसून येत आहे.
नक्की पाहा हे फोटो >> फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…
खापरी येथे मेट्रो मार्गिकेच्या उद्गाटनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान समृद्धीच्या वायफळ टोल नाक्याजवळ असलेल्या कार्यक्रम स्थळी आले. तेथे त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशाचे पथक तैनात करण्यात आले होते. मोदींनी थोडा वेळ ढोलही वाजवला.
नक्की वाचा >> पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?
समृद्धी महामार्गाबरोबरच पंतप्रधान मोदींनी नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन केलं. त्याप्रमाणे मोदींनी एम्सचंही उदघाटन केलं.