दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. परीक्षेचा ताण आणि भीतीपोटी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेता विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी विद्या परिषदेने ३८३ समुपदेशकांची चमू तयार केली आहे. या शिक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी कोणत्याही क्षणी त्यांच्याशी संवाद साधून आपल्या अडचणी दूर करू शकणार आहेत.
हेही वाचा >>> बुलढाणा : शिंदे-फडणवीस सरकारची दादागिरी सहन करणार नाही – नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांवरील लाठीमार…
सध्या दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून काही दिवसांतच परीक्षेला प्रारंभ होणार आहे. या काळात विद्यार्थ्यांनी खचून जाऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी एससीईआरटीने समुपदेशकांची फळी उभी केली आहे. परीक्षापूर्व कालावधी,
परीक्षेदरम्यानचा कालावधी, परीक्षेनंतरचा कालावधी तसेच निकाल लागल्यानंतरच्या कालावधीत ही समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध राहणार आहे. या समुपदेशकांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताणतणाव कमी करणे, तसेच करिअरविषयक मार्गदर्शनही मिळणार आहे. ३८३ समुपदेशकांची यादी व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक एससीईआरटीचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. तसेच हे क्रमांक सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही सोपवली आहे. भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गायत्री भुसारी तसेच विजय अदमाने यांच्याकडे समुपदेशनाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण आल्यास यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात यांच्याशी संपर्क साधावा
अमरावती : चंद्रशेखर गुलवाडे, अरुणा मार्डीकर, अभिजित देशमुख, मनीष भडांगे, रिझवान खान.
भंडारा : विजय आदमने, गायत्री भुसारी, मो. कलीम मो. हाजी.
बुलढाणा : संतोष लालवानी, संजय तातोबा राठोड, प्रल्हाद खरात, नंदकिशोर लघे, व्ही. टी. भास्कर.
चंद्रपूर : विजय वैरागडे, सुधीर डांगे, केशव घरत, रवींद्र गुरनुके, सतीश पाटील, प्रवीण आडे, राकेश रहाटे.
गडचिरोली : महादेव देवराम, विनोदकुमार कोरेटी, अनिल नुटीलकंठवार.
गोंदिया : लक्ष्मीकांत लांजेवार, मिलिंद रंगारी, आनंद लांजेवार, अजय भिवगडे.
नागपूर : प्रतिमा मोरे, मोहन भेलकर, गिरधारी चव्हाण, विशाल गोस्वामी, हरीश राठी. वर्धा : राजेश सातपुते. शरद वांढरे विठ्ठल.