अमरावती : राज्यातील अनेक विरोधी पक्षनेते अखेरीस भाजप सोबत आले. यात एकनाथ शिंदे, अजित पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे सध्‍याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील लवकरच पक्षांतर करतील असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. त्‍यावर आशिष देशमुख कोण आहेत, स्‍वार्थासाठी चार वेळा त्‍यांनी पक्ष बदलला आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ओबीसी जागर यात्रेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आशिष देशमुख यांनी हा दावा केला. आतापर्यंत राज्याच्या अनेक विरोधी पक्षनेत्यांनी पक्षांतर केले आहे, आताचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे देखील नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच पक्षांतर करतील. ते सरकारमध्ये दिसतील, असे आशिष देशमुख म्‍हणाले. भाजपचा डीएनए हा ओबीसींचा असल्याचेही त्‍यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने २ ऑक्टोबरपासून पार्डी येथून ओबीसी संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या मार्गदर्शनामध्ये यात्रा सुरु आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Rohit Pawar angry on Fadnavis Govt as after 35 days Santosh Deshmukh killers not punished Brother Dhananjay protesting
“न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवण्यासाठी…”, धनंजय देशमुखांच्या आंदोलनानंतर रोहित पवारांचा सरकारवर संताप
bjp plan to contest local bodies elections alone after huge success in assembly elections
भाजप शत-प्रतिशतकडे; शिर्डीच्या महाविजयी मेळाव्यात दिशादर्शन; शहांची उपस्थिती
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”

हेही वाचा >>> वडेट्टीवार राहुल गांधीबाबत खरे बोलले! बावनकुळेचा चिमटा

आशिष देशमुख म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसींचा सर्वाधिक विकास करण्यात आला. मोदींनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात ३५ टक्के म्हणजेच २७ ओबीसी खासदारांना मंत्री केले. तसेच ओबीसींच्या विकासासाठी विविध योजनाही राबविण्यात येत आहेत. परंतु कॉँग्रेस नेते राहुल गांधी ओबीसींची दिशाभूल करीत आहेत. विजय वडेट्टीवर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांच्‍यात वक्‍तृत्‍व शैली नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतर विरोधी पक्षनेत्‍यांप्रमाणे ते देखील लवकरच पक्षांतर करतील असे आशिष देशमुख म्हणाले. यावेळी आमदार तथा शहराध्यक्ष प्रवीण पोटे, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, जयंत डेहणकर, चेतन पवार व इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष देशमुख कोण?

आशिष देशमुख कोण आहेत, ते भाजपमध्‍ये कोणत्‍या पदावर आहेत, असा सवाल करीत विजय वडेट्टीवार यांनी भाजपमध्‍ये जाण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे प्रत्‍युत्‍तर दिले आहे. वडेट्टीवार म्‍हणाले, आशिष देशमुखांनी स्‍वार्थासाठी चार वेळा पक्ष बदलला. राहुल गांधी आमचे नेते आहेत. पुण्‍याच्‍या कार्यक्रमात मंचावर दोन राहुल होते. अनवधानाने राहुल गांधी असे निघून गेले. देशात सत्‍तापरिवर्तन हे राहुल गांधी यांच्‍यामुळेच होणार आहे. माझ्या शब्‍दाचा विपर्यास करण्‍यात आला. भाजपमध्‍ये जाण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Story img Loader