नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत “फ्लाइंग किस” केल्याची तक्रार मंत्री स्मृती ईराणी आणि भाजपच्या महिला खादारांनी केली आहे. एवढेच नव्हे तर भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने राहुल गांधी विरोधात आंदोलन केले जात आहे. पण भाजपच्या या तक्रारीचे वेगळेच कारण विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर प्रेस क्लबमध्ये त्यांच्याशी बुधवारी वार्तालाप करण्यात आला होता. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला सरकार उत्तर देऊ शकत नाही. मणिपूरवर बोलायला त्यांच्याकडे काही नाही. त्यामुळे कपोलकल्पित घटनेचा बनाव करण्यात आला. भाजपने महिलांना पुढे करून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचे नवीन शस्त्र शोधले. मणिपूर दंगल सरकार पुरस्कृत आहे. या मुद्द्यावर लोकांचे लक्ष विचलित करण्याचा भाजपचा आहे. पण ते भाजप मधील पुरुषांना जमले नाही म्हणून आता त्यांनी महिलांना पुढे केलं आहे, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay vedditar given reason for attacking rahul gandhi by bjp womans rbt 74 amy