चंद्रपूर: भाजप मुख्यमंत्री पदावरून नकळत दूर करेल याची कल्पना एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे ते झोपेत स्वप्नात देखील मुख्यमंत्री पदाची खुर्ची पकडुन झोपतात, असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी लावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपुरात वडेट्टीवार यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत एकनाथ शिंदे यांना भाजप मुख्यमंत्री पदावरून दूर करणार आहे अशी माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर बसविण्यासाठी ही खेळी खेळली जाणार आहे. या सर्व राजकीय कसरतीमध्ये शिंदे गटाचे मंत्री व आमदार तीव्र नाराज आहेत. या विचित्र परिस्थितीत व सर्वांना सांभाळता सांभाळता शिंदे यांची झोप उडाली आहे.

हेही वाचा… कांद्याच्‍या दरात आठवडाभरात क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ; निर्यात शुल्‍कवाढीने कांदा उत्‍पादकांमध्‍ये रोष

शिंदे झोपले तरी स्वप्नात देखील मुख्यमंत्री पदाची खुर्ची भाजप नेते घेऊन जाईल याची त्यांना भीती असल्याने ते स्वप्नात देखील खुर्ची पकडुन ठेवतात अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. त्यांना भीती आहे अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर येऊन बसतील. हा विनोदाचा भाग असला तरी राज्याची राजकीय स्थिती मुख्यमंत्री पदावरून इतकी वाईट आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.