नागपूर : राणा दाम्प्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचन करण्याचे आंदोलन केले होते. त्यावरून राज्याचे राजकारण तापले होते. हे प्रकरण न्यायालयात गेले असून सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राणा यांना फटकारले. यावरून विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी आमदार रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला.
वडेट्टीवार म्हणाले, भाजपाने कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीचा मुद्दा आणला. पण, त्याचा काही फायदा भाजपाला झाला नाही. बजरंगबलीच्या नावाचा वापर करण्याची चलाखी राणा करतील तर बजरंगबली त्यांच्या पाठीत गदा मारतील. त्यांच्या पाठीचा कणा मोडतील आणि म्हणतील की, माझे नाव घेऊ नको.