नागपूर : राणा दाम्प्त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचन करण्याचे आंदोलन केले होते. त्यावरून राज्याचे राजकारण तापले होते. हे प्रकरण न्यायालयात गेले असून सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्याने न्यायालयाने राणा यांना फटकारले. यावरून विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी आमदार रवी राणा यांच्यावर हल्लाबोल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शाळांमध्ये आता शिक्षणासोबतच निसर्गाशी जवळीक साधण्याचीही संधी; जिल्‍हा परिषदांच्या शाळांमध्‍ये फुलणार परसबाग

हेही वाचा – विद्यार्थ्यांनो त्वरा करा! उच्‍च शिक्षणासाठी शिष्‍यवृत्‍ती; उद्याची मुदत, जाणून घ्या सविस्तर..

वडेट्टीवार म्हणाले, भाजपाने कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीचा मुद्दा आणला. पण, त्याचा काही फायदा भाजपाला झाला नाही. बजरंगबलीच्या नावाचा वापर करण्याची चलाखी राणा करतील तर बजरंगबली त्यांच्या पाठीत गदा मारतील. त्यांच्या पाठीचा कणा मोडतील आणि म्हणतील की, माझे नाव घेऊ नको.