नागपूर : दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीला दिलेली तडकाफडकी स्थगिती महायुतीसाठी नामुष्कीचे कारण ठरली आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, “ही सगळी परिस्थिती पाहून जनताच या सरकारला स्थगिती देईल. काय सावळा गोंधळ सुरू आहे ? एवढे बहुमत असताना महायुतीत आपसात मतभेद टोकाला पोहोचले आहे, सत्तेसाठी, पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा आहे. शर्मेने मान खाली घालावी अशी स्पर्धा सुरू आहे.. “भांडा सौख्यभरे असे म्हणण्याची वेळ आली आहे” आज पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल.. त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल.असा टोला त्यांनी हाणला.

शिंदेची स्थिती बिकट

नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे… शिंदे यांची गरज संपली का? ते बाजूला व्हावे, असे भाजपला वाटते. उद्धवजींना संपवून शिंदेंना आणलं आता शिंदेंना संपवून नवीन’ उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे.

हेही वाचा…सप्ताहभर सुंदर व मनोवेधक आकाश नजाऱ्याचे दर्शन; सर्व ग्रह सूर्याच्या…

उदय सामंत का?

उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही तबल्यावर हात ठेवून आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी नेतृत्व संपवण्याचे प्रयत्न

पंकजा मुंडे यांनी आता दुःख करून काही मिळणार नाही एक एक ओबीसीचे मत घेऊ सत्तेवर आले. ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे नेतृत्वहीन करायचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे.असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा…उत्तीर्ण उमेदवारांचे गुण जाहीर न केल्याने संशयाचे धुके; चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण

धनंजय मुंडेला आत्ता का आठवले?

पहाटेच्या शपथविधीला जाऊ नये, असे मी अजित पवार यांना सांगितले होते.असे धनंजय मुंडे आता सांगत आहेत.अंगावर आल्यावर सगळे आठवते, त्यावेळेस का नाही आठवलं ? पुढाकार कोणी घेतला? पुढे तुम्हीच गेले… दादा सोबत जाणारा पहिला माणूस हा धनंजय मुंडे स्वतः होता, असे वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader